शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सातारा जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व ऑनलाइन जुगार धंदे जोमात : अन्न प्रशासन व पोलीस यंत्रणा सुन्न


 चांगदेव काळेल 

महाराष्ट्र पोलीस न्यूज



सातारा  ;   सातारा शहरा मध्ये अनेक पान स्टॉलवर अवैध गुटखा विक्री शहरामध्ये मोळ्याचा ओढा, वाडे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, कोडोली, गोडोली, गुरुवार परस, साई मंदिर परिसर अश्या अनेक ठिकाणी ऑनलाइन जुगार अवैधरित्या धंद्यांना बहर आलेला असून, पोलीस यंत्रणा जाणून बुजून  या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. 

             यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना बळ मिळत आहे, शहरातील तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, शहरातील अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले असून, दारू, गुटखा, जुगार धंदे शहरात मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे, 

             ‌‌‍ त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन अनेक आजारांना बळी पडत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने जिभेवर लाल पांढरे चट्टे होत असून अनेक तरुणांना तिखट अन्न सेवन करता येत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत, अशा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दातांना रंग चढून दातांची संवेदनाही नष्ट होत आहे, त्यामुळे अशा सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता असते, सीमावर्ती भागातील परराज्यातून गुटख्याची आवक ग्रामीण व शहरी परिसरात होत आहे.

           सातारा हद्दीतील पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकाद्वारे बोलले जात आहे. शासनाने गुटखाबंदी केलेली आहे, मात्र ग्रामीण व शहरी भागात पान टपरी तसेच काही किराणा दुकानातून खुलेआम गुटखा, विक्री होत आहे, याकडे संबंधित अन्न प्रशासन अधिकारी यांनी लक्ष वेधून गुटखाविक्री करणार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

           अवैध जुगार धंदे करणाऱ्या वर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अनेक विविध प्रकारचे आंदोलन झाले पण गुटखा विक्री व जुगारधंदे जोमात पोलीस यंत्रणा व अन्न औषध प्रशासन अक्षरशः कोमात असा प्रकार झाला असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. यावर संबंधित अधिकारी कारवाई करणार का याकडे दुर्लक्ष करणार हा येणारा काळच ठरवेल..



Post a Comment

Previous Post Next Post