सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे, (हवेली) (मांजरी बुद्रुक) : लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या पेक्षा समाजपरिवर्तन करण्याची ऊर्जा सामाजिक कार्यकर्त्यांकडे जास्त असते. शिक्षकांनी जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्या प्रमाणे स्वतःला जोखुन देऊन शाळांच्या मध्ये काम केले तर संस्कारक्षम बुध्दिमान पिढी निर्माण होईल असे राज्य विधानमंडळाचे सेवानिवृत्त सहसचिव अशोक मोहिते यांनी सांगितले.
अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने त्यांना जलसंपदा विभागाचे विशेष प्रकल्प मुख्य अभियंता डॉ. हनुमंतराव धुमाळ यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी मोहिते बोलत होते. संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, राजीव घुले, आदित्य घुले, बाबासाहेब शिंगोटे, शिवराज घुले यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने स्व. शिवाजीराव घुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधुन अकरावा आदर्श शिक्षक पुरस्कार दत्तात्रय लांडगे, हनुमंत बागल, बाळासाहेब नेवाळे, रोहिणी फुलपगारे, श्रीकांत पिंगळे, दिलीप मोडक, झीनत सय्यद, मनोज जोगराणा, भागुजी शिखरे, अनिल चंद, सुरेखा कुंजीर, निलाक्षी भुजबळ, प्रियांका राऊत, सविता घोडे, दिलवरसिंग पावरा यांना प्रदान करण्यात आला.
कार रॅली चॅम्पियन निकिता टकले यांना यावेळी युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.धुमाळ म्हणाले शिक्षकांना आताच्या काळात संस्था चालकांच्या आणि पालकांच्या हस्तक्षेपा मुलांना मोकळेपणाने शिक्षण देता येत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे संयोजन अतुल रासकर, समीर घुले, गोरख आडेकर यांनी केले.

Post a Comment