सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य तिथी निमित्त प्रतिमेला प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी पदे भूषविली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केली. त्यांनी घेतलेल्या विकासाच्या निर्णयांचे दूरगामी परिमाण होत आहेत. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यांच्या विषयी त्यांना आस्था होती. त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी या महाविद्यालयाची पायाभरणी केली होती. असे मनोगत या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी
व्यक्त केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. नाना झगडे, प्रा. राजेश मोरे, प्रा.अण्णासाहेब निंबाळकर, प्रा. अनुराधा कांबळे, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा.भागवत भराटे, प्रा. मंजुषा भोसले, प्रा.लता धुमाळ कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रशांत मुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंजुषा भोसले यांनी केले तर आभार प्रा. विलास शिंदे यांनी मानले.



Post a Comment