सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : दिवाळी सणाच्या निमित्ताने हडपसर मध्ये हडपसर परिसरातील "बचतगट” महिलांना त्यांच्या व्यवसायात मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने मोफत दिवाळी आनंदी मेळावा घेण्यात आला.
रविवारी दिनांक ५ नोव्हेंबर रोजी हडपसर उड्डाण पुलाच्या खाली या स्टाॅलचे आयोजन करण्यात आले.
बचत गटातील महिलाना त्यानी बनविलेले वस्तू विकण्यासाठी प्लेटफॉर्म मिळावा या उद्देशाने या दिवाळी आनंदी मेळावा चे आयोजन केले होते. हडपसर मधील काही समाजसेविका, उद्योजक यांनी मिळून हा कार्यक्रम केला.. यामध्ये एकूण ६० स्टॉल लावले गेले होते..
या मध्ये महिलांनी आपल्या कलाकुसर नुसार फराळ, मसाले, ज्वेलरी, आकाशकंदील, कपडे, दिवे, दिवाळी सामान व इतर वस्तूंचेही प्रदर्शन व विक्री केली.
महिलांना या उपक्रमाला छान प्रतिसाद आला.. या कार्यक्रमाचे आयोजन हेमा लाळगे, स्मिता गायकवाड, वंदना मोडक, छाया माने, मीनाक्षी आहिरे, दीपाली कवडे, रोहिणी भोसले, अश्विनी शेंडे, रुपाली शिंदे, रोहिणी क्षिरसागर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य धनराज गवळी यांनी केले. बाळासाहेब केमकर यांची मोलाची साथ लाभली. पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

Post a Comment