सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : भारत ही मोठी लोकशाही असून निवडणुका हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. युवकांनी तरुणांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते.
येत्या वर्षातील निवडणुका लक्षात घेता विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी व्हावी या उद्देशाने निवडणूक साक्षरता मंडळ विद्यार्थी कल्याण मंडळ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात दि. ५ सप्टेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान संपन्न झाले. याची सुरुवात पाच सप्टेंबर पासून शिक्षक दिनाचे निमित्त साधून झाली.
यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील संतोष लोंढे उपस्थित होते. तसेच कोंडे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी करून घेतली तसेच ऑफलाइन फॉर्म भरून घेतले.
यावेळी २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर दिनांक ८ डिसेंबर पर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी नवं मतदारांची नोंदणी करून घेत होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या कमवा शिका योजना योजनेतील विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे दररोज अकरा ते एक या वेळेत विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी केली जात होती. दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी शिवाजी अढागळे, सहाय्यक शिक्षण अधिकारी, हडपसर क्षेत्रीय कार्यालय व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मतदार नोंदणी अभियानाला भेट दिली. विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना तरुण हा देशाच्या लोकशाहीचा कणा असून त्यांच्याकडून हे काम होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी महाविद्यालयात विविध पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून त्यांना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत १२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सांगितले.



Post a Comment