सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (जुन्नर) : ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या ग्राहकांच्या हिताचे कार्य करणाऱ्या संघटनेची पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याची मासिक बैठक पिपळवंडी येथे १९/१२/२०२३ रोजी दुपारी १:३० वाजता संपन्न झाली.
ग्राहक कल्याण फाऊंडेशनची बैठक राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट साठे व सहसचिव व प्रसिद्ध प्रमुख सुनिल थोरात यांच्या. उपस्थितीत पार पडली.
पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे यांनी यांनी ग्राहकांचे अधिकार, ग्राहकांची होणारी पिळवणूक यावर पर्याय तक्रार दाराने दिलेल्या तक्रार अर्ज कसा भरायचा त्यावर नियमाला धरून अर्ज मागणी संदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन केले.
जिल्हा उपाध्यक्ष पोपट साठे यांनी अन्न भेसळ, वजन माप व महावितरणा संदर्भात परिपत्रक व नियमावली यावर तक्रारीचे मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा सहसचिव व प्रसिद्ध प्रमुख यांनी संघटनेची वाढ व संघटनेतील तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यक्रमांना प्रसिद्ध देताना शासकीय अधिकारी यांना पत्र व्यवहार यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन गणपत अभंग यांनी केले. तर कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचेव उपस्थित कार्यकर्ते यांचे आभार मारुती कोकाटे यांनी केले बैठक संपल्याचे जाहीर केले.
यावेळी बैठकीसाठी पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट साठे, पुणे जिल्हा सहसचिव व प्रसिद्धी प्रमुख सुनिल थोरात, तालुका अध्यक्ष पांडुरंग घाडगे, तालुका उपाध्यक्ष तुषार भोर तालुका, सचिव मारुती कोकाटे , तालुका सदस्य गणपत अभंग, तालुका सदस्य रमेश घाडगे, तालुका सदस्य रमेश कोकाटे , तालुका सदस्य बबन कालेकर, तालुका सदस्य प्रकाश पवार, तालुका सदस्य गंगाराम तोतरे, तालुका सदस्य संकेत हाडे, तालुका सदस्य शिवाजी काकडे, तालुका सदस्य कांता काकडे, तालुका सदस्य सुवर्णा काकडे, तालुका सदस्य तुकाराम जोरी, तालुका सदस्य आरती जोरी, तालुका सदस्य दिपक गायकवाड, तालुका सदस्य प्रविण वाळुंज, तालुका सदस्य संदीप काकडे, तालुका सदस्य मंगेश अभंग, तालुका सदस्य रशिदखान पठाण, तालुका सदस्य मनोज काकडे व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment