शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेततळ्यात बुडवून महिलेचा खून चौघांना अटक : मासाळवाडी, बारामती


 सुशीलकुमार अडागळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (बारामती) : मासाळवाडी ता बारामती येथे शारिरीक व मानसिक छळ, करत एका महिलेचा निर्दयीपणे खून करण्यात आला.

                   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४ मौजे मासाळवाडी ता. बारामती येथील मयत सुरेखा भाऊसाहेब गडदरे यांचा राहात्या घराजवळील शेततळ्यात ओढणीने हात बांधून, पाण्यात बुडवून खून करण्यात आला. 

             या प्रकरणी नामदेव बबन करगळ (मयताचे वडील) रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे यांनी तक्रार दाखल केली आहे. 

              या प्रकरणाची दखल घेत वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे कलम ३०२, ३०४(ब),४९८(अ) ३४ सह हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९९६ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी भाऊसाहेब महादेव गडदरे (पती) ठकुबाई महादेव गडदरे (सासू) मासाऴवाडी ता बारामती आशा सोनबा कोकरे(नणंद)सोनबा चंदर कोकरे रा. कुतवऴवाडी ता बारामती यांना अटक करण्यात आली आहे.

           गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.कोर्ट बारामती यांचेकडे रवाना करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे वडगाव निंबाळकर  पोलीस स्टेशन करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post