शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी ; खासदार ; श्री.छ. उदयनराजे भोसले

 

चांगदेव काळेल (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्यूज


सातारा : ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र सुरू केले होते, त्यामुळे महाराष्ट्र मध्ये ६ जानेवारी रोजी दर्पण दिन (पत्रकार दिन) साजरा केला जातो,

             सातारा जिल्ह्यातील नागठाणे भाग पत्रकार बहुउद्देशीय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दर्पण दिन व पत्रकार सन्मान सोहळा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अपशिंगे येथे संपन्न झाला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, धर्यशील कदम जिल्हाध्यक्ष भाजपा, मनोज घोरपडे सदस्य जि. प सातार, सुनील काटकर (मा.जि प सभापती) यांच्या शुभहस्ते पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

           पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन करताना श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले की पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी, तर बदलत्या काळानुसार पत्रकार बांधवांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन जि.प.माजी सभापती सुनील काटकर यांनी केले. आजच्या ब्रेकिंग न्यूज च्या जमान्यात हे प्रिंट मीडियाची विश्वासहर्ता कायम असल्याचे सांगितले.



           यावेळी जेष्ठ पत्रकार पा. प. पवार, प्रमोद पंचपोर, संदीप कणसे, विकास काटकर, अविनाश करंडे, विजय घोरपडे, संदीप जाधव, सुधीर जाधव, विलास तळेकर, धनाजी शेडगे, धनाजी जाधव, आदीसह उपस्थित पत्रकार बांधवांना यावेळी नागठाणे भाग पत्रकार बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष धनाजी कणसे, उपाध्यक्ष सूर्यकांत पवार, संघाचे सचिव शंकर कदम, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता घाडगे संस्थापक विजय आलाटे, सतीश जाधव, तज्ञ सल्लागार सुनील शेडगे, विकास जाधव प्रताप भोसले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले,

            कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे सचिव शंकर कदम, आभार धनाजी कणसे, तर सूत्रसंचालन सूर्यकांत पवार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post