सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओ.बी.सी. आघाडीच्या "सरचिटणीस" ; स्मिता गायकवाड यांची नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. नियुक्तीचे प्रमाणपत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मा. नामदेवजी माळवदे यांच्या हस्ते देऊन करण्यात आले.
त्याप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. दिलीपभाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, मा. आ. जगदीशभाऊ मुळीक, माजी शहराध्यक्ष, मा.राज्यमंत्री व अनुसूचित जातीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. दिलीपभाऊ कांबळे, मा.पुणे शहर लोकसभचे प्रभारी मा. श्रीनाथ भिमाले, मा.विक्रांत पाटील, मा स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने, माजी ओबीसी शहराध्यक्ष मा. योगेश पिंगळे, भाजपा प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, रिपाइं युवक आघाडी कार्याध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र निलेशभाऊ आल्हाट, श्री गोविंद साठे सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित भाजपचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते..
निवडीनंतर स्मिता गायकवाड यांनी पदाला न्याय नक्की मिळवून देईल. पक्षाने दिलेल्या शिकवणीनुसार पद कुठलेही असो ते गाजवले पाहिजे. तरच त्या पदाला अर्थ आहे या भावनेने मी काम करते आहे व पुढेही नक्की करणार.. पक्षाने दिलेल्या संधीचे मी सोने नक्कीच करणार असे सांगितले.


Post a Comment