शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जिल्हा रुग्णालय सातारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणातचे आजार, उपचार यांचे प्रबोधन..


 चांगदेव काळेल (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्यूज

सातारा : सातारकर जागरूक व्हा २६ जानेवारी २०२४- प्रजासत्ताक दिवसानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे, मा. अधिष्ठाता डॉ. चव्हाण, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष कदम व डॉ राहुल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाकडून जिल्हा रुग्णालय सातारा, व सर्व उप-जिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयाच्या दर्शनीय भागात व्यसनमुक्ती पेटी लावण्यात आली आहे.

             रुग्णालयात प्रवेश करताना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ बाळगण्यास कारवाई किंवा दंड करण्यात येणार आहे. तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, प्रतिबंध, व व्यापार वाणिज्य, उत्पादन, पुरवठा, व वितरण याचे विनीमन) कायदा २००३ ची प्रभावपणे अंमलबजावणी करणे करिता सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करणे बाबत सूचना मा. सहसंचालक, आरोग्य सेवा मुंबई यांच्या कडून सूचना प्राप्त आहेत.



              सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यामुळे आणि थुंकल्यामुळे स्वाईन फ्लू, क्षयरोग, निमोनिया, आणि पोटाचे विकार इ. जंतुसंसर्गजन्य आजार पसरतात. क्षयरोगाचा जिवाणू हा थुंकी द्वारे पसरतो त्यामुळे इत्तर लोकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो..



                 Global Youth Tobacco Survey (GYTS 2009 ) नुसार १३ ते १५ या वयोगटातील विध्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण १४.६% आहे. साधारणतः १७ वर्षपासून तंबाखूचे सेवन होते. २५.८ % मुले त्यांचे वय १५ वर्ष होण्यागोदारच तंबाखू चे सेवन सुरु करतात. तंबाखू हि NicotinaTobaccum या वनस्पतीपासून प्राप्त केली जाते. तयार तंबाखूमध्ये व इतर २५५० रासायनिक घटकांचा समावेश असतो. तंबाखूयुक्त धुम्रापांनामध्ये ७००० रासायनिक पदार्थ असतात. त्यापैकी ६९ हे रासायनिक पदार्थ असे असतात कि जे सरळ कॅन्सर ला कारणीभूत ठरतात. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो जो कि  अतिशय विषारी व्यसनाला कारणीभूत आणि प्राणघातक घटक आहे. निकोटीन अल्कोहोल पेक्षा १००० पटीने जास्त धोकादायक आहे. कोकेन, हिरोईन, म्यारीजुयेना, मोर्फीन आणि भांग या पेक्षाही निकोटीन जास्त प्रमाणात व्याशानशीलता असते. तंबाखू मध्ये निकोटीन, टार. बेन्झोपाय्रीन, कार्बन मोनाक्सीड, फोर्माल्डीहेड बेन्झीन, हायड्रोजन सायनाईड, अर्सेनिक, कॅडमियुम , अमोनिया, टरपेनटाइंन, मिथोप्रिन, असीटोन, लेड, व प्रोपीलीनग्लायकोल विविध प्रकारचे घातक रसायने असतात. तंबाखू सेवनाने आरोग्यावर दीर्घकालीन खालीलप्रमाणे दुष्परिणाम होतात.

             अन्न नलिका व पचान्संस्थेसंबंधी आजार – प्राथमिक अवस्थेत पांढरे व लाल चट्टे येणे, त्तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटात अल्सर, स्वादुपिंडाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग

           श्वासन संस्थेचे आजार- स्वरयंत्राचा कर्करोग, श्वासनालीकेचा’ कर्करोग, फुफुसाचा कर्करोग, जुनाट कफ, अस्थमा ,दम,

               रक्तवहन संस्था – अतिउच्चरक्तदाब, हृदयरोग व इतर रक्त वाहिन्यासंबंधी चे आजार नेत्र – मोतीबिंदू

             प्रजनन संस्था – पुरुषांमध्ये नापुंसक्ता स्त्रियांमध्ये गर्भधारणेची क्षमता कमी होणे, बाळाचे जन्मता कमी वजन होणे, जन्मतः बालमृत अवस्थेत जन्मू शकते, अकाली प्रसूती होणे, नवजात बालकाची फुफुसांची कार्याशामता कमी असणे.

         सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३

            भारत सरकारने सन २००३ मध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ तयार केला आहे. सदर कायद्यातील काही महत्वाची कलमे खाली दिली आहेत.

         कलम ४ – सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी – निष्क्रिय धूम्रपानापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी करण्यात आली आहे. जसे रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमान स्थळ, सर्व सरकारी व खाजगी कार्यालये, सर्व कामाचे ठिकाणी, शाळा, न्यायालये, रुग्णालये इ.

या कलमाचे उल्लंघन करणार्यांना रु. २०० पर्यंत दंड आकारला जातो. 

             कलम ५ – तंबाखू ची जाहिरात प्रसार आणि प्रायोजकत्व या वर बंदी तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात कुठल्याही माध्यमातून असो त्यवर बंदी आणणे तसेच कुठल्याहीतंबाखू कंपनीने एखाद्या सांस्कृतिक किवा प्यायोजाकात. 

            सदर कायद्याच्या उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय संपर्क केंद्राला १८००११०४५६ या क्रमांकावर मोफत संपर्क करता येईल. या कलमाचे उल्लंघन करणार्यांना पहिला गुन्हा असेल तर १ वर्षा पर्यंत शिक्षा व १००० रु. पर्यंत दंड आकारला जातो. दुसरा गुन्हा असेल तर ५ वर्ष कारावास व ५००० रु. पर्यंत दंड आकारला जातो.

          कलम ६- अ) लहान मुलांना (१८ वर्षाखालील) तंबाखू जन्य पदार्थ विकणे किंवा त्यांच्या कडून विक्री करून घेणे या वर बंदी आहे. या कलमाचे उल्लंघन करणार्यांना रु. २०० पर्यंत दंड आकारला जातो

            कलम ६- ब) कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू जन्य पदार्थ विकणेस बंदी आहे. या कलमाचे उल्लंघन करणार्यांना रु. २०० पर्यंत दंड आकारला जातो.

            कलम ७) तंबाखू उत्पादनावर मचकूर व चित्र स्वरुपात धोक्याच्या सूचना देणे बंधनकारक आहे. या कलमाचे उल्लंघन करणार्यांना पहिला गुन्हा असेल तर २ वर्षा पर्यंत शिक्षा व ५००० रु. पर्यंत दंड आकारला जातो. दुसरा गुन्हा असेल तर ५ वर्ष कारावास व १०,००० रु. पर्यंत दंड आकारला गुन्हा जातो.तं

     तंबाखू सेवन बंद करण्यासाठी काय कराल तंबाखू सेवन बंद करण्यासाठी प्रथम स्वतः मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. तंबाखू चे व्यसन स्वतः हून सोडू शकतात किंवा समुपदेशकाची मदत घेवू शकतात. जिल्हा रुग्णालय सातारा येथिल दंत विभाग येथे आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालय येथे तंबाखू समुपदेशन केंद्रामध्ये व्ययक्तिक व सामुहिक समुपदेशन केले जाते. तसेच तंबाखू सेवन बंद करण्यासाठी खालील four “A’ व Five ‘D’ चा वापर करावा.

                            four “A’

          Avoid – ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सेवनाची आठवण येत असेल अशा गोष्टी ताळा.

Alter Your Habits – तुमच्या सवयी बदला, तंबाखूजन्य पदार्था ऐवजी आरोग्यकारक गोष्टींचे सेवन करा. उदा. पाणी, फळांचा रस इ.

            Alternatives – तोंडात चघळण्यासाठी तंबाखू ऐवजी इतर गोष्टींचा वापर करा. जसे फळे, कच्चा भाजीपाला उदा. गाजर, बीट, मुळा, पेरू, केळी, टरबूज इ.

Activities – दररोज ध्यान व व्यायाम करा. 

                             Five ‘D’

Deep Breathing – शांतपणे खोलवर श्वास घ्या व ताजी व स्वच्छ हवा तुमच्या फुफुसात गेल्याचा विचार करा.

           Delay – जेव्हा तंबाखू ची ईछा होईल तेव्हा १० मिनिट वाट बघा. अशामुळे काही वेळाने तंबाखू सेवनाची तुमची ईछा नाहीसी होण्यास मदत होईल.

Drink Water – जास्त पाणी सेवनाने तंबाखू ची ईछा कमी होण्यास मदत होईल.

Do Something else – वाचन, खेळणे, पोहणे ए छंद जोपासणी अशा नवीन नवीन सवयीमध्ये मन रमवा.

Discuss – तुमच्या मित्रांबरोबर किंवा परिवाराबरोबर तुमचे विचार व्यक्त करा.

Post a Comment

Previous Post Next Post