शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बाजार समिती संचालक मंडळाविरोधात बाळासाहेब भिसे यांचे आमरण उपोषण" निषेध करण्यासाठी आंदोलकाने स्वतःची बांधली तिरडी...न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण माघार नाही - बाळासाहेब भिसे


 श्री सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारांची चौकशी व्हावी व खोतीदारांना पुन्हा मांजरी उपबाजारात पूर्ववत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी बाळासाहेब भिसे यांनी मार्केटच्या प्रवेश द्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे, न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही भिसे यांनी स्वतःची तिरडी बांधून आता मरण किंवा न्याय असा इशारा संचालक मंडळाला दिला आहे.

            मांजरी उपबाजारातील या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले असून संचालक मंडळाचा गैरकारभार

थांबणार का असा प्रश्न  निर्माण झाला.

           तीन महिन्यापासून खोतिदारांना मज्जाव केल्याने मजूरनाही, मजूर, महिला, ड्रायव्हर, कामगार यांच्यावर बेकारी ची कुऱ्हाड कोसळली आहे, वारंवार मागणी करूनही संचालक मंडळाने या निर्णयाचा फेरविचार केला नाही.

            गेल्या तीन महिन्यापासून संचालक मंडळांने  मांजरी उपबाजारात खोतिदार व्यापाऱ्यांना मज्जाव केला आहे तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठराव करुन गैरकारभार चालविला आहे, या गैरकारभाराची राज्य शासनामार्फत चौकशी व्हावी व खोतीदार व्यापाऱ्यांना मांजरी उपबाजारात पुन्हा प्रवेश द्यावा अशी आग्रही भूमिका बाळासाहेब भिसे यांनी या उपोषण प्रसंगी मांडली. कुपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बाजार समिती संचालक गणेश घुले, लोणी काळभोरचे सरपंच योगेश नाना काळभोर, माजी सरपंच सचिन तात्या तुपे, रुपाली शिंदे जनरल कामगार अध्यक्षा, श्रद्धा जाधव युवती अध्यक्षा, आण्णा बोडके सरचिटणीस रा काॅ. हवेली, पुरुषोत्तम कुंजीर हवेली दिंडी अध्यक्ष, राजकुमार काळभोर, अमृत नाना काळभोर, माऊली माथेफोड, गोरख तुपे माजी उपसरपंच कुंजीरवाडी,  भरत काळभोर, लालुशेठ चावट, संजय चांदणे पाटील, मोहन चिंचकर आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.



              संचालक मंडळांने खोतिदारांवर अन्याय केला असून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील हा प्रश्न अतिशय गंभीर असून शरद पवार यांच्यामार्फत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

            संचालक मंडळाने आमच्या खोतिदारांवर अन्याय केला असून आज मी कुटुंबासमोरच माझी तिरडी बांधली आहे, तिरडी घेऊन जाईल किंवा मला संचालक मंडळाकडून न्याय मिळेल जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरन उपोषण सोडणार नाही असा इशारा आंदोलक बाळासाहेब भिसे यांनी यावेळी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post