शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन ; पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांची हाॅस्पिटल मध्ये धाव...


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : पुणे पोलीस आयुक्तातील फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक विश्वासराव धुमाळ यांचे उपचारा दरम्यान सोमवार दिनांक २९/१/२०२४ रोजी निधन झाले आहे, 

            अशोक धुमाळ हे आंबेगाव येथील राहत्या घरातून तिसऱ्या मजल्या वरून पाय घसरून पडले होते, गंभीर जखमी झालेल्या अशोक धुमाळ यांना खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे, अशोक धुमाळ यांच्या मृत्यूची बातमी समजताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे धाव घेतली आहे,

            पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (वय ५७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post