धनंजय काळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
सोलापूर (करमाळा) : ६ सप्टेंबर २०२३ रोजी करमाळा तालुक्यातील तीन कामे (टेंडर निविदा) निविदा क्रमांक १४ सन २०२३-२४ ऑनलाइन प्रसिद्ध होऊन चार महिने उलटून गेले तरी अद्याप निविदा उघडल्या नाहीत
त्या त्वरित उघडण्यात याव्या अन्यथा दि. १९/०१/२०२४ रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर मुदत बेमुदत हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निविदा क्रमांक १४ सन २०२३-२४ ऑनलाईन मधील करमाळा तालुक्यातील (१) बोरगाव कारंजे मिरगव्हाण कोळगाव निमगाव गोंडरे नेरले लव्हे ते जेऊर रस्ता प्रजिमा ६ किमी ०/०० ते २/६०० व २३/१०० ते २७/७००, (२) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर (२) ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा १२४ किमी १०/०० ते १५/१००, (३) मिरगव्हाण अर्जुन नगर शेलगाव का सौदे वरकुटणे कोंढेज रस्ता प्रजिमा ८ किमी ९/०० ते १२/०० ता. करमाळा जि. सोलापूर ही कामे ६ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध होऊन सुद्धा अद्याप उपडण्यात आली नाहीत. जवळजवळ चार महिने होऊन गेले तरी पण जबाबदार अधिकारी काम करत नाहीत. म्हणून वारंवार असे होऊन सदर कामे मॅनेज कडून याचा फायदा ठेकेदार यांना करून देण्यासाठी आणि त्या बदल्यात अधिकारी स्वतःला आर्थिक माया गोळा करण्यासाठी हे प्रकार करत आहेत तरी हे काम
चार महिने का थांबले आहे. सरकारने निधी मंजूर करून सुद्धा कशासाठी चार महिने थांबवावे लागतेय..? सर्वसामान्य शेतकरी त्याच रस्त्यावरून प्रवास करत आहेत फक्त आणि फक्त काम मॅनेज करण्यासाठी अधिकारी फाईल दाबून ठेवत आहेत. ठेकेदारचा फायदा करणे म्हणजे शासनाचे नुकसान करणे. ही निविदा म्हणजे ऑनलाईन करण्यामागे शासनाचा उद्देश असतो की टेंडर प्रक्रियांमध्ये स्पर्धा निर्माण करून कमी पैशात चांगले काम करून घेणे.
परंतु अधिकारी काही पैसे मिळवण्याच्या आशेपोटी अशा फाईल दाबून ठेवत असतील तर सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी आणि सरकारच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या संख्येने करमाळा तालुक्यातील शेतकरी सोबत घेऊन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी विठ्ठल आबा मस्के, राणा वाघमारे, गणेश वयभासे, उमाकांत तिडके, विनीता बरफे, शर्मिला नलवडे, शरद येकाड, अक्षय देवडकर, शरद सपाटे, दिपाली डिरे, कोमल खटमोडे, बालाजी तरंगे, अतुल राऊत, हनुमंत कानतोडे, बंडू शिंदे, काका घरबुडे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे उपस्थित होते

Post a Comment