गंगाराम उबाळे प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (सिंदखेडराजा) : राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरीता पर्यवेक्षक प्रगणक यांच्या मार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्या बाबतच्या आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार आयोगामार्फत शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातीचे सर्वेक्षण करून माहिती गोळा करण्यात येत असून सर्वेक्षणाचे काम दिनांक २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालवधीत पूर्ण करावयाचे आहे.
यासाठी प्रत्येक गावात १५० ते २०० कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी १ प्रगणक नेमण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व नागरिकांना सिंदखेड राजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्याकडून कळविण्यात येते की, सर्वेक्षण दरम्यान कुटुंब प्रमुखांनी घरी थांबून आपल्या कुटुंबाची प्रगणक यांनी विचारलेली सविस्तर माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे.

Post a Comment