सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (ता. हवेली) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीसह अन्य अवैध व्यवसायावर थेट कारवाई करणार असल्याचे संकेत नव्याने पदभार स्विकारलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत.
तसेच 'कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल', असा सज्जड इशाराच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिला. उरुळी कांचनसह परिसरातील गुंडगिरी, किरकोळ कारणांवरून भांडणे, मारामारी, गांजा, गुटखा, अवैध वाहतूक, वाहतूक कोंडी आदींवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दुचाकी चोरी, दोन गटातील भांडणांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. परगावी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांच्या अनेक घरांमध्ये चोरी, बाजारात होत असलेली मोबाईल सोनसाखळी चोरीचे प्रकार होत आहेत. हाणामारी, दगडफेक अशाही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने नागरिकांकडून पाटील यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
उरुळी कांचन परिसरातील सराईत गुन्हेगारांवर (रेकार्डवरील) दररोज पेट्रोलिंग करणाऱ्यां पोलिसांचा'वॉच' असणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रेकार्डवरील गुन्हेगारांच्या घरी भेटी देऊन तो घरात आहे का, बाहेर असल्यास तो कोठे आहे, त्याच्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून तो गुन्हेगार शहरातील नवीन गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे की नाही, याची खात्री होईल. त्यातून गुन्हेगारी आटोक्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
..पोलिस खात्यांतर्गत सुधारणे बदल व नियंत्रण आवश्यक..
👉🏻 पोलिसांसह डीबी पथकाचा गुन्हेगारीवल पुन्हा नियंत्रण निर्माण करणे
👉🏻गुन्ह्यांच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांची क्रयशक्ती वाढवणे ?
👉🏻पोलिस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांत बदल करून नागरिकांमध्ये सुसंवाद वाढवणे.
👉🏻गस्त पथकांची निर्मिती करण्यासाठी ठिक ठिकाणी नागरिकांच्या मदतीने प्रयत्न करणे.
👉🏻गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देणार
👉🏻अवैध धंदे, अवैध वाहतूक यांच्यावर ठोस कारवाई करावी लागणार.
👉🏻 सामाजिक कार्य करणाऱ्या समाजातील अनेकांशी सुसंवाद साधणार
👉🏻कायदा व सुव्यवस्था, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्राधान्य

Post a Comment