शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आकाशवाणी झोपडपट्टी मधील नागरिकांना हक्काची मोफत घरे मिळवीत यासाठी संघटितपणे लढा देणार : डॉ. भारत पाटणकर


 चांगदेव काळेल (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्यूज


सातारा : आकाशवाणी झोपडपट्टी मधील नागरिकांच्या हककाच्या व मोफत घराच्या प्रश्नासाठी आयोजित मेळाव्यामध्ये विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या एकजुटीसाठी आणि समन्वयासाठी "माजगावकर माळ आकाशवाणी झोपडपट्टी संघर्ष कृती समिति" ची औपचारिक घोषणा करण्यात आली.

               यामध्ये सर्व नागरिक हे सदस्य समन्वयक असणार आहेत. स्थानिक रहिवाशी यांच्या मोफत घरकुलसाठीच्या संघटित लढा देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकजुटीची वज्रमुठ आवळली आहे. आमचा लढा हक्कांसाठी माणूस म्हणून जगण्यासाठी, लढेंगे जितेंगे व महामानवांच्या घोषणा देत आजच्या निर्धार मेळाव्याला हजारो नागरिक यांनी सहभागी होवून. आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शविली. 

             यावेळी उपस्थित मान्यवर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. आकाशवाणी झोपडपट्टी येथील घरकुल आवास योजनेच्या नावाखाली स्थानिक झोपापट्टीमधील रहिवाशी यांना शासनाने मोफत घरकुल योजनेमधून घरे देणे महत्वाचे असताना लोकाना कोणतेच ठोस लेखी हमी न देता योजनेबाबत योग्य माहिती न देता घरकुल योजनेच्या नावाखाली स्थानिक नागरीकाना सातारा नगरपालिका विस्थापित करण्याचे काम करीत आहे. ज्यांच्या चार पिढ्या या आकाशवाणी परिसरात राहत आहेत त्यांना कायद्याने संरक्षण देणे गरजेचे आहे. आमचा तुमच्या योजनेला विरोध नाही पण शासनाच्या योजनेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात असेल आणि आर्थिक शोषण होणार असेल तर हे आम्ही भारतीय नागरिक म्हणून सहन करणार नाही. याबाबत संघटिपणे लढा देण्याचे काम स्थानिक नागरीकाना करावे लागेल असे मत व्यक्त केले. 

            यानंतर लाल निशाण पक्षाचे कामगार नेते कॉ. अतुल दिघे यांनी नागरिकांना संबोधित केले आकाशवाणी झोपडपट्टी मधील कामगार,  मजूर यांना भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कासाठी लाल निशाण पक्ष लाल बावटा सर्व ताकदीनिशी आपल्या लढ्यात सहभागी असणार आहे. इथल्या प्रतेक नागरिकाला शासनाने मोफत घरे दिली पाहिजेत.सातारा शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या आकाशवाणी मधील नागरिकांना मोफत घरे मिळत नाहीत तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा विश्वास लोकाना दिला. 

          या आंदोलनामध्ये मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी ही सहभाग नोंदवला आहे. झोपटपट्टी मधील रहिवाशांना न्याय मिळण्यासाठी एकत्रित लढा उभा करून. प्रशासनाने व शासनाने केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी हा लढा सुरू झालेला आहे.

                वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी आपला पाठिंबा या मेळव्याला देत पुढील काळात वेळ पडल्यास स्वतः नेते अॅड.  बाळासाहेब आंबेडकर यामध्ये लोकांच्या हक्कासाठी आपल्या सोबत येथील असा विश्वास स्थानिक नागरीकाना दिला.

                यानंतर वंचित चे कामगार नेते गणेश भिसे यांनी लोकाना आपल्या प्रश्नासाठी एकत्रित राहून हा लढा लढायचा आहे आणि तो आपल्या सर्वाना जिंकायचा आहे. संघर्ष या आपल्याला नवा नाही पण जर आमच्या मूलभूत हक्कासाठी आम्हाला संघर्ष करण्याची वेळ आली तर वंचित बहुजन आघाडी झोपडपट्टी मधील नागरिकांच्या सोबत उभी असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नासाठी आपणच संघटित होवून लढा देवूयात असे मत व्यक्त केले. 

                 यावेळी वंचित चे संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून आपण आपल्या घराच्या हक्कासाठी जुलमी यंत्रणेविरोधात आणि दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोक संघर्ष उभा करणे अनिवार्य आहे.

               यानंतर स्थानिक समन्वयक प्रतिनिधि म्हणून गणेश वाघमारे यांनी आपली भूमिका मांडली या झोपडपट्टी मध्ये आमच्या चार पिढ्या आम्ही रहिवास करीत आहोत यामध्ये आमची एक पिढी मेली, आमच्या घामाच्या श्रमाच्या दामाने एक एक रुपया साठवून आम्ही ही घरे उभी केली कोणतीच सुविधा नसताना या जागेला आम्ही नागरिकांनी राखून ठेवले चाळीस वर्षापेक्षा जास्त आम्ही येथे राहत आहोत आणि घरकुल योजनेच्या नावाखाली सातारा नगरपालिका प्रशासन लोकाना जबदरस्ती कोणतीही लेखी हमी न देता इतरत्र स्थलांतर करीत आहे. योजनेची योग्य लेखी माहिती न देता वेळोवेळी वेगवेगळी माहिती देवून फक्त नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम अधिकारी आणि प्रशासन करीत आहे. शासन सामाजिक , आर्थिक मागासवर्गीय लोकांना मोफत घरे देत असताना इथे सुरू असलेली घरकुल योजना झोपडपट्टी मधील लोकांचे सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा कोणताच विचार न करता लादली जात आहे का? असा सवाल उपस्थित केला. 

                  स्थानिक प्रतिनिधि म्हणून सचिन कांबळे यांनी लोकांना संघटित राहण्याचे आणि प्रत्येकाने आपले निवेदन तयार करून त्यासोबत आकाशवाणी झोपडपट्टी मध्ये आपण रहिवाशी असलेल्या सर्व कागदपत्राचे पुरावे जोडण्याचे सांगितले तसेच दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्धार मोर्चा मध्ये प्रतेक घरामधील सर्व लोकांनी मोठ्या संखेने सहभागी होण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले. यानंतर  प्रतिनिधि मिलिंद कांबळे यांनी आपली भूमिका मांडली आकाशवाणी झोपडपट्टी हककाच्या मोफत घरासाठी चा लढा हा एकट्या व्यक्तीचा नाही तर तो सर्व झोपडपट्टीमधील नागरिकांच्या एकजुटीचा आहे. त्यामुळे आंदोलन मध्ये मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.

           उपस्थित नागरिकांनी हात वर करून एकजुटीने लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. यावेळी आकाशवाणी झोपडपट्टी संघर्ष कृती समितीच्या वतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. १६ जानेवारी २०२४ सकाळी ९ वाजता हक्काच्या व मोफत घरासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्वानी मोठ्यासंखेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.   

            यावेळी माजगावकर माळ आकाशवाणी झोपडपट्टी चे प्रतिनिधि म्हणून नागेश सातपुते, पल्लवी काकडे, माया कांबळे, किरण आवळे, संजय घाडगे, रेखा खंडूजोडे, अमोल मोरे, शशी कदम, अजय कांबळे,सुनील मोरे,  संजय कोठवडे, तारा दबडे, पद्मा सुतार, हिना कच्छी, लखण चव्हाण, नागेश पडवळ, रवींद्र आवळे, मनीषा कांबळे, कल्पना भोसले, चंदू कुऱ्हाडे या समन्वयकासह हजारो नागरिक निर्धार मेळाव्यामध्ये उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post