शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"खोतीदार आंदोलनाच्या समर्थनार्थ हडपसर भाजीपाला मार्केट बंद; "मार्केट संचालकांच्या चौकशीवर बाळासाहेब भिसे ठाम"


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : संचालक मंडळाचा खोतीदार विरोधात होणाऱ्या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करण्यासाठी हडपसर भाजीपाला मार्केट बंद करून बाळासाहेब भिसे यांच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी ठिय्या मारण्यात येणार आहे. 


            असा इशारा हडपसर मधील किरकोळ कष्टकरी व्यापाऱ्यांनी दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले उपोषणाचा सहावा दिवस असताना संचालक मंडळाकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे परवानगी देताना जाचक अटी टाकल्याने खोतीदार व शेतकरी अडचणीत येणार आहे त्यामुळे त्यांच्या जाचक अटी मान्य न करता उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार बाळासाहेब भिसे यांनी केला आहे.


            पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना हडपसरच्या व्यापाऱ्यांनी बाळासाहेब भिसे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच शुक्रवारी मांजरी उपबाजारातून माल खरेदी न करता हडपसर भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला सर्व व्यापारी उपोषण स्थळी बाळासाहेब भिसे यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येणार आहेत. असे कष्टकरी व्यापाऱ्यांनी सांगितले 


               यावेळी हडपसर पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटनेचे व्यापारी सचिन शेवाळे, बाप्पु मोडक, मयुर फडतरे, किरण ससाणे, अक्षय काळे, निलेश दर्शले, संतोष होले, हितेश भिसे, रोहित सुर्यवंशी, संतोष भुजबळ, रुपेश गव्हाणे, गोविद लोखंडे, माऊली गोफणे आदी उपस्थित होते.


             दरम्यान उपोषण स्थळी आमदार अशोक पवार, माजी आमदार महादेव बाबर, राजेंद्र बाबर, अप्पा मांदळे, राजू कोंडे, दुर्योधन कामठे, नंदकुमार सरोदे, संजय मेहता, दिलीप गायकवाड, प्रवीण टिळेकर, पत्रकार कृष्णकांत कोबल, अनिल मोरे, रागिणी सोनवणे, अक्षय दोमाले यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.


            रयत शेतकरी संघटनेचे हेमंत चौधरी, रामदास कोतवाल यांनी संचालकांचे पत्र घेऊन  आंदोलक बाळासाहेब भिसे यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली संचालकांच्या जाचक अटी मान्य नाहीत. संचालकांच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे भिसे यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे आंदोलनाचा तिढा वाढत चालला आहे, सहावा दिवस असताना संचालक मंडळाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post