....एक मध्यमवर्गीय माणूस व त्याचे जगणं....त्यांचे घर काम ....
सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : एक मध्यम वर्गिय माणूस सकाळी उठल्या नंतर पहिल्यांदा तोड़ धुतो, दांत घासतो, नैसर्गिक विधी या सर्व गोष्टी आवरतो. आंघोळ करून, कपड़े घालून तयार होतो, चहा पीत पेपर वाचतो, नाश्ता करतो, घरातून कामासाठी जाताना कामासाठी लागणार्या वस्तू स़बत घेऊन कामाला निघुन जातो, बाहर आल्यावर रिक्शा करतो, मग सिटी बस किवा लोकल ट्रेन मधून वा स्वतः च्या गाडीने ऑफिस ला पोहचतो, तिथे पूर्ण दिवस काम करतो, सहकारी बरोबर चहा पीतो, संध्याकाळी घरी यायला निघतो, घरी येणाऱ्या वाटेत मुलांना खाऊ व बायकोला गजरा व किराणा घेतो, मोबाइल रिचार्ज करतो, अश अनेक छोटी मोठी कामे करत घरी येतो.
आता आपण मला सांगा या दिवस भरात त्याला कोणी हिंदू, मुसलमान व दलित भेटले का? का त्याने दिवस भर कोणा वर अत्याचार केले का ?
त्याला दिवस भर जे भेटले ते होते....पेपर वाला पोऱ्या..., दूध वाला काका, रिक्शावाला, बस कंडक्टर, ऑफिस चे मित्र, आंगतुक, पान वाला भैया, चहा वाले मामा, खाऊ चा दुकानदार, मिठाई वाला.
जर ही सर्व माणसे मित्र व काका आणि मामा आहेत तर यांच्या मधे हिन्दू, मुसलमान किंवा दलित कुठे आहेत ?
"का दिवस भर त्याने कोणाला विचारले का की, तू हिन्दू का, मुसलमान का, दलित आहेस?
जर तू हिन्दू, मुसलमान किंवा दलित आहेस तर मी तुझा रिक्शातून, बस मधून नाही येणार तुझा हाताची चहा नाही पिणार, तुझा दुकानातून खाऊ नाहीं घेणार, का त्याने किराणा, दूध, पेपर घेताना कोणाला वीचारले का की हे सर्व करणारे हिन्दू आहे मुसलमान किंवा दलित आहे ?
"जर आपल्या रोजच्या जीवनात भेटणारी माणसे हिन्दू, मुसलमान वा दलित नाहीत तर काय कारण आहे कि निवडणूक आली कि आपण सर्व हिन्दू, मुसलमान, वा दलित होतो?
...समाजातील तीन विष...
टीवी वर चाललेली चर्चा, राजकारणी नेत्यांची भाषणे आणि काही तिरसट लोकांचे सोशल मीडिया वर टाकलेले भडकावणारे मैसेज.... या सर्वा पासून दूर राहिलो तर काही प्रमाणात समस्या सुटतील.
(हा मॅसेज सोशल मिडिया वर फिरत असल्याने कुठल्याही व्यक्तीशी, पक्षाशी व कुठल्याही एका समाजाशी संबंधित नाही.)


Post a Comment