उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंञी ब्रिजेश पाठक बारामती लोकसभेची निवडणूक पुर्व तयारीची बैठक पुणे येथे संपन्न..
गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बारामती) : लोकसभा कोअर कमिटी, सॅपर वाॅरीयर, गन व गट प्रमुख, बुथ प्रमुख यांची पुणे येथे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंञी ब्रिजेश पाठक यांनी निवडणूक पुर्व तयारीची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लोक हिता साठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल माहिती दिली. बारामती लोकसभेत वरिष्ठ ज्याला उमेदवारी देवून उभे करतील त्याला प्रचंड मताने निवडुन आणण्याचे आदेश दिला. मग तो उमेदवार कोण आहे हे न बघता आपण मोदीजींना मतदान करतोय अशा विचाराने काम करा असा संदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक वासुदेव (नाना) काळे यांच्या नेतृत्वाखाली, ओबीसी मोर्चा व अनुसूचित मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने उपमुख्यमंञी पाठक यांना संविधान प्रत भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकसभा कोअर कमिटीची बैठक पार पडल्या नंतर उपमुख्यमंञी पाठक यांनी बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन केले. संपुर्ण कार्यक्रम जिल्हाध्यक्ष वासुदेव (नाना)काळे यांच्या मार्गदर्शनात पार पडला, यावेळी आमदार भिमराव (आण्णा) तापकीर, माजी आमदार आशोक टेकावडे, लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष काका जगताप, राजेश पांडेजी, बाळासाहेब गावडे, रंजन (काका)तावरे, महामंञी शेखर वढने, जिल्हा अध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा गजानन वाकसे, अनुसूचित मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुर कांबळे, माऊली (काका)चवरे, मारुती वनवे, महामंञी अभिजित देवकाते पाटील, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव श्रीकांत ताम्हाणे, राजेंद्र गुरव, सचिन लंबाते, मच्छिंद्र टिंगरे याच बरोबर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणूक काळात काम करण्यास प्रचंड मोठी उर्जा मिळेल.


Post a Comment