गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली,
इंदापूर तालुक्यातील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती इंदापूर परिसरात कळताच हर्षवर्धन पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा व इंदापूर भाजपा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, मा. तंटामुक्त अध्यक्ष संतोष लोंढे, मा. ग्रामपंचायत सदस्य नेताजी लोंढे, हनुमंत निंबाळकर, अक्षय चव्हाण, सरपंच रोहित मोहोळकर, पांडुरंग सुळ, तुकाराम वाडकर, धिरज पवार, सोनू खर्जुल, दिपक रुपणवर, देविदास बोराटे, वैभव चव्हाण, आंबादास गायकवाड, पै. गायकवाड, सर्वेस सुतार, कोळेकर महाराज याच बरोबर गर्जना प्रतिष्ठान चे व उमाजी नाईक जयंती उत्सव समितीचे युवक उपस्थित होते.
या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांना भागवतगिता भेट देण्यात आली तसेच त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यास नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment