गजानन टिंगरे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे भोसरी : लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार या वर्षी कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते गाडी लोहार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष युवराज मुरार जाधव यांना जाहीर झाला आहे.
डिसेंबर महिन्यात संस्थेच्या वतीने या पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या पुरस्कारासाठी तज्ञ परीक्षकांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे संस्थेने ॲड युवराज जाधव यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सामाजिक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांची लोहार समाज बहुउद्देशीय संस्था-जीवन गौरव पुरस्कार २०२३-२४ साठी निवड केली आहे.
संस्थेचे वतीने अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले. ५००१ रुपये, स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या वतीने रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
संस्थेचे वतीने दिला जाणारा हा चौथा जीवन गौरव पुरस्कार आहे. यापुर्वी अखिल महाराष्ट्र गाडी लोहार महासंघाचे कै.उत्तमराव पडघमकर व निवृत्त न्यायाधीश दत्तात्रेय सम्राट, नागपूर येथील डॉ वसंतराव साळवणकर या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Post a Comment