शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल २१ हजार १५८ बालकांना पोलिओचा डोस : लोणी काळभोर

 ..प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल २१ हजार १५८ बालकांना पोलिओचा डोस : लोणी काळभोर..


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच वर्षाखालील तब्बल २१ हजार १५८ बालकांना रविवारी (ता. ३) पोलिओचा डोस देण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली भंगाळे व डॉ डी. जे जाधव यांनी दिली.


        या दरम्यान पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी फिरती पथके कार्यरत होती. जिल्ह्याप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.


         आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' या मथळ्याखाली राबविले.




          नागरिकांनी अफवा, अंधश्रद्धेला बळी न पडता बालकांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले आहे 

   

           लोणी काळभोर आरोग्य केंद्रांतर्गत मांजरी, केशवनगर, महादेवनगर, साडेसतरा नळी, कदमवाकवस्ती, रायवाडी व लोणी काळभोर असे सात उपकेंद्र आहेत. या केंद्रांतर्गत पोलिओ लसीकरणासाठी ७६ बूथ ठिकठिकाणी तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर ४ मोबाईल टीम व लोणी स्टेशन व मांजरी स्टेशनवर ट्रान्सजेट टीम लसीकरण करीत होते. रविवारी (ता. ३) सकाळपासूनच पोलिओ लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


          या लसीकरणासाठी ६ डॉक्टर, कनिष्ठ सहाय्यक१, ३ परिचारिका, नर्सिंगच्या २५ हून अधिक विद्यार्थिनी, ७ आरोग्यसेविका, १ सुपरवायझर, पोलिओ सुपरवायझर १६ व आशा वॉर्डन यांनी हे पोलिओचे विक्रमी लसीकरण केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post