शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

क्रिडा व राजकारण एकत्र केल्याने जनता कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवेल... कमलेश काळभोर

...सांगता सभेत कमलेश कारभोर यांची विरोधकांवर खोचक टिका : क्रिडा व राजकारण एकत्र केल्याने जनता धडा शिकवेल... कमलेश काळभोर.


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 

 

पुणे (हवेली) : यशवंत सहकारी कारखान्याची निवडणूक १३-१४ वर्षांपूर्वी पंधरा-वीस वर्षांपूर्वी झाली असेल परंतु ती आमच्या युवकांच्या फारशी लक्षात नाही. या निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून या प्रक्रियेमध्ये मी एक साक्षीदार आहे. 


         पहिल्या दिवसापासून दिलीप दादा काळभोर, सुरेश आण्णा घुले, व्यासपीठावरील  ही सगळी मंडळी पहिल्या दिवसापासून यांचा एकच हेतू तो म्हणजे यशवंत निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि प्रामाणिक इच्छा ही होती मी (कमलेश काळभोर) पहिल्या दिवसापासून निरिक्षण केलं की निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.




           राजकारणामुळे शेतकरी, कारखाना मंजुर आधीच कारखान्याचे इतकं नुकसान झाले. भविष्यकाळात ही नुकसान होऊ नये. एवढी प्रामाणिक इच्छा आणि प्रामाणिक हेतू घेऊन ज्याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलत होते. त्याच्याशी पटत नाही त्याला सांगत होते. हे सगळे पटत नसणाऱ्या मंडळींना त्यांनी आपलंसं केलं बिनविरोध संचालक मंडळालाचे प्रयत्न चालले होते. परंतु काही हट्टी आणि मी तर म्हणतो की ज्यांना तालुक्याचे नेतृत्व स्वतःच स्थापन करायचंय एवढा एकच हेतू यांच्याकडे बाकी यांच्याकडे कुठला हेतू नाही. निवडणूक झाली तर मी तालुक्याचा नेता होईल एवढं एकमेव चुकीचा हेतू ठेवून विरोधकांनी निवडणूक लादली. आणि अखेर निवडणूक चालू झाल्या प्रचार सभा सुरू झाला. 


        सभेला उद्देशून कमलेश काळभोर म्हणाले अण्णा विरोधकांची प्रचाराची पातळी दिवसं दिवस ढासळत चालले. जशी जशी यांची परिस्थिती खराब होत चालली तशी तशी टीका करण्याची यांची पातळी ढासळत चालली. वंदनाताईंनी सांगितलं इतक्या खालच्या भाषेत त्यांनी काही टीका, खोटे आरोप केले गेले. ते सगळे आरोप खोटे आहेत.



           कमलेश काळभोर पुढे म्हणाले एखाद्याचे चारित्र्यावर आरोप करायचा असेल तर आज सगळ्यात सोपी गोष्ट झाली सोशल मीडिया आहे. त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यांनी केला परंतु तुम्हाला सांगतो की सगळी जुनी मंडळी यांनी राजकारण केलं तिथे बसलेली मंडळी कदाचित एकमेकांच्या विरोधात बरेच निवडणुका लढवल्या परंतु टीका करायची पातळी आणि राजकारणातला प्रोटोकॉल पाळला.


           वैयक्तिक व्यक्तीवर टीका करू नये एखाद्याचे चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीचे भाषण वापरू नये. याचे ह्यांनी तारतम्य पाळले नाही. परंतु आजकाली गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेली दोन मंडळी विशेषता आमच्या लोणी काळभोर मधील यांना कसलेही ताळतंत्र राहिले नाही म्हणजे आपण काय बोलतोय कोणाविषयी बोलतोय काय बोलायला पाहिजे. 


              विषयांतर करतो आपल्या देशाला सगळ्यात पहिला ऑलिंपिक मेडल जर कोणी दिला असेल ना तर एक कुस्ती खेळाणे दिलं आणि खाशाबा जाधव यांनी झालेल्या ऑलंपिक मध्ये देशाला पहिले मेडल मिळवून दिले. अशी लाल मातीची आपली शांत कुस्ती सांगायचं तात्पर्य आहे की एखाद्या व्यक्तीच्या खेळातल्या अचिवमेंट आणि राजकारण याची गल्लत करण्याची चूक तुम्ही केलेली आहे. 

       

         आज या ठिकाणी आपल्या गावातला एक सुपुत्र आहे. लोणी काळभोरचा ज्यांनी या गावचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नाव कोरले. आज एकदा पैलवान जर घडतो तो स्पोर्ट्समन घडतो इथे माझ्या माता भगिनी आहेत. सगळ्या खेळात डेंजर खेळ असेल तर कुस्ती आणि इजा होण्याचे सगळ्यात जास्त धोका कुस्तीमध्ये असतो. १४ वर्षे कुस्ती खेळुनही कोणाला मेडल मिळवता येत नाही. 

          आज आपल्या गावात असा एक कसा हिरा आहे २००१ साली महाराष्ट्र केसरीचा किताब मिळून या लोणी काळभोर गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा लावला. या पैलवानाला आज तुम्ही त्याच्या खेळाची तुलना राजकारणात ओढून केली. त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली. ते आमचे महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांना यांचे किती  दु:ख झाले असेल याची कल्पना न केलेली बरी. यांचे उत्तर मी दिले असते किंवा महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांनी दिले असते. परंतु ती आमची शिकवण नाही. व्यासपीठावरील मान्यवर यांनी विकासाचे राजकारण करायला शिकवले. या विरोधकांच्या टिकेला कारखान्याच्या निमित्ताने माय बाप जनता मतदानातून चोख उत्तर देईल यात शंका नाही. 



           अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या किटली या चिन्हावर मतदान करुन सर्व उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या. हेच त्या टिकेचे उत्तर असेल..

Post a Comment

Previous Post Next Post