शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लोणी काळभोर येथील आठवडे बाजार उद्या राहणार बंद ; यशवंत कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

...लोणी काळभोर येथील आठवडे बाजार उद्या राहणार बंद...



सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याने लोणी काळभोर येथील शनिवारी (ता. ९) भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रियांका काळभोर यांनी दिली.


             यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. या निवडणुकीचे मतदान लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बाजारात शेतकरी, विक्रेते, व्यापारी, नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या अनुषंगाने शनिवारी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.


            परिसरातील शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व ग्राहकांनी बाजारामध्ये गर्दी करू नये व विशेष करून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल शनिवारच्या लोणी काळभोर बाजारामध्ये विक्रीसाठी आणू नये, असे निवेदन ग्रामपंचायती मार्फत कळविण्यात आले आहे.

       

         त्या अनुषंगाने सर्व व्यापारी, शेतकरी व ग्राहकांनी सहकार्य करावे. थेऊर येथील यशवंत कारखान्याचे मतदान होतं असल्याने कोणाचीही गैरसोय होऊ नये. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त असल्याने सर्वांनी सहकार्य करावे असे लोणी काळभोरच्या उपसरपंच प्रियांका काळभोर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post