गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बारामती) : महाराष्ट्रात २०२४ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. आणि यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची झाली. संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे. म्हणजे नणंद विरूद्ध भावजय... असा रंगतदार सामना येणार्या काळात जनतेला पाहायला मिळणार आहे.
... सुनेत्रा पवार यांची शिक्षण, आवड आणि सामाजिक कार्य, आणि राजकारण....
सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. वडिलांचे नाव बाजीराव भगवंतराव पाटील तर आईचे नाव दौपदी बाजीराव पाटील असे आहे. सुनेत्रा पवारांचे बी. कॉम झाले असून, व्यवसाय शेती आहे. चित्रकला, वाचन, शेती, निसर्ग फोटोग्राफी हे त्यांचे छंद असून, व्यवसाय, सामाजिक कार्य, मुलींसाठी शिक्षण यामध्ये विशेष सहयोग
बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती. अध्यक्षा, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार या आहेत. त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग, शिक्षण संस्था, काऱ्हाटी, बारामती क्लबच्या विश्वस्तही अशा ठिकाणी कार्यरत आहेत.
....मिळालेले पुरस्कार....
सुनेत्रा पवार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल चिंचवड देवस्थान तर्फे 'श्रीमत् महासाधू श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार २०२१', सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 'जीवन गौरव पुरस्कार २०२३' आणि 'ग्रीन वॉरीयर पुरस्कार पुणे. लोकमत तर्फे 'आऊटस्टँडींग वुमन अवार्ड' आणि 'लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे. तर ग्रामीण भागात जागरूकता निर्माण केल्याबद्दल ईटी जेन नेक्स्ट आयकॉन्स पुरस्कार तर राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ असे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
....शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदान....
सुनेत्रा पवार यांनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीर, कर्करोग जनजागृती तसेच मासिक जागर अभियान, महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन केले आहे. विद्या प्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काम केले आहे. विज्ञान प्रदर्शन आणि जत्रांच्या माध्यमातून मुलांना प्रोत्साहन दिले आहे. काटेवाडी गावात २००० पासून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. आणि २०२४ बारामती लोकसभेच्या उमेवार म्हणून उभ्या राहिल्या आहेत.
...म्हणजे नणंद विरूद्ध भावजय...



Post a Comment