त्रिशरण व पंचशीलाचे पठण करुन जयंती आनंदनगर येथे साजरी : (जंक्शन) इंदापूर
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक संदेश देणाऱ्या स्तुत्य उपक्रमाने साजरी करण्यात आली.
१४ एप्रिल २०२४ रोजी आनंदनगर जंक्शन येथे महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ व्या जयंतीनिमित्त नील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सर्व महापुरुषांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण व पंचशीलाचे पठण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त देशाचे संरक्षण करणाऱ्या व आपल्या जीवाची परवाना करता देश संरक्षणासाठी योद्धाची भूमिका पार पाडणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा सियोन राजा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांनी योद्धाचा शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सहपत्नीक सत्कार यावेळी करण्यात आला.
मेजर सचिन साबळे, मेजर गोविंद कांबळे, मेजर भारत गवळी, मेजर मनोहर जाधव, मेजर जालिंदर रसाळ, मेजर विक्रम रसाळ, मेजर सुभाष गायकवाड अशा देश सेवेसाठी योगदान देणाऱ्या योद्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर आप्पासाहेब जगदाळे संचालक पिडीसी बँक पुणे, तेजसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट अध्यक्ष, गजानन वाकसे अध्यक्ष ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, संजय भाऊ काळे माजी शिवसेना अध्यक्ष, इंदापूर रोहित दादा मोहोळकर सरपंच आनंदनगर, निवृत्ती गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य इंदापूर सारिका संजीव लोंढे, पंचायत समिती सदस्य इंदापूर सागर मिसाळ, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट, विक्रम साळुंखे साहेब पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन, मिलिंद मिटापल्ली सहाय्यक पोलीस निरीक्षण वालचंदनगर पोलीस स्टेशन, रामेश्वर माने, लघु उद्योजक जंक्शन व इतर या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संजीव लोंढे अध्यक्ष सीयोन राजा बहुउद्देशीय प्रतिष्ठान जंक्शन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आनंदनगर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.





Post a Comment