बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेञा (वहिनी) पवार यांच्या प्रचाराचे भाजप पदाधिकारी पुर्ण वेळ काम करणार...
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : राज्यांचे उपमुख्यमंञी अजित पवार हे २०२४ लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुधवारी इंदापूर तालुक्यात प्रथमच आले होते.
कार्यक्रमाचे स्वरुप होते डाॅक्टर,वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर बैठक. यावेळेस इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुती च्या उमेदवार सौ सुनेञा (वहिनी) पवार यांचा, इंदापूर तालुक्यात भाजप पुर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याची ग्वाही गजानन वाकसे यांनी दिली आहे.
भाजपचे सर्व पदाधिकारी पुर्ण वेळ प्रचाराचे काम करत आसून तळागाळा पर्यत उमेदवार व चिन्ह पोहचवत आहेत अशी माहिती यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांनी दिली.
यावेळी सत्कार करण्यासाठी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली चवरे, ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, पंचायत राज आघाडीचे प्रदेश सहसंयोजक माऊली वाघमोडे, तालुकाध्यक्ष शरद जामदार, विष्णुपंत मकर काटी वडापुरी गटाचे प्रभारी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदिप आदलींग, ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सरल ॲप प्रमुख सुयोग सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment