शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मंगलदास बांदल कोण आहेत? लोकसभेच्या रिंगणात वंचितने दिली उमेदवारी जाणून घ्या...

 पैलवान मंगलदास बांदल शिरूर मधुन लोकसभा लढणार; वंचितने दिली उमेदवारी.. अमोल कोल्हे यांना फटका बसण्याची दाट शक्यता... अमोल कोल्हे, शिवाजी आढाळराव पाटील यांना शिरूर मधुन मंगलदास बांदल आवाहन देणार...





सुनिल थोरात (महाराष्ट्र संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आंबेडकर यांनी आपले स्वतंत्र उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली. 


         मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर

                  कोण मंगलदास बांदल?

           पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मंगलदास बांदल त्यांच्या नावांच्या वारंवार चर्चा केल्या जातात. पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती म्हणून ही राजकारणात ठसा उमटवला आहे. मंगलदास बांदल यांनी २००९ ला विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही सक्रिय होते. अपक्ष उमेदवार म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल यावेळी उपस्थित होते. तसा राजकारणात चाणक्य म्हणून परीचीत आहेत. वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर करून शिरूर लोकसभेसाठी वंचित कडून तगडा उमेदवार दिल्याने विद्यमान खासदार यांना चांगलीच कसरत करावी लागणार यात शंका नाही. मंगलदास बांदल यांच्या रुपाने जनते समोर तिसरा पर्याय ठेवल्याने तिरंगी होणार लोकसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे



             मंगलदास बांदल यांचे पुर्व हवेतील वजन असल्याने पुर्व हवेलीतून मताधिक्य मिळवणार यात शंका नाही असे जाणकारांचे मत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post