प्रतिनिधी चांगदेव काळेल
सिव्हिल हॉस्पिटल शेजारी मेडिकल कॉलेज चे बांधकाम म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस
या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झालेले असून चार मजल्याचे काम झालेले असताना तळ माळ्यावर विद्याथ्र्यांचे वर्ग भरवले जात आहेत ,परंतु विद्यार्थी आणि प्राध्यापक जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यायचे कमा करीत आहेत कारण तळ मजल्यावर देखील असणारी प्रत्येक खोलीत पाणीच पाणी आहे , विध्यार्त्याना रेनकोट अथवा छत्री घेऊन च प्रत्येक खोलीत जावे लागत आहे ,
या प्रशासनाला लाज कशी वाटत नाही ,अशा प्रश्न आता निर्माण झाला आहे ,कारण प्रत्येक ठिकाणी गळती एव्हडी मोठी आहे की पाणी सर्व विद्युत उपकरणं मध्ये जात आहे , याच्यातून अचानक पने विद्युत प्रवाह जर पाण्यात उतरला तर प्रचंड मोठी जीवित हानी सुधा होण्या सारखी आहे , या सर्व कारभाराची स्वतः जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी आणि संबधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता,उपअभियंता ,ज्युनियर अभियंता यांचे त्वरित कठोर कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तीव्र आंदोलन. करून काम बंद पाडण्यात येईल आपला सचिन मोहिते जिल्हाप्रमुख शिवसेना सातारा जिल्हा
Post a Comment