शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ....मुलीने प्रतिकार केला म्हणून मुलीला पाजले विष मुलीचा झाला मृत्यू.. उरण ,शिळफाट्याच्या घटनेनंतर आता इंदापुर....



इंदापूर हादरले....धक्कादायक.....

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न मुलीने प्रतिकार केला विष पाजले मृत्यू..

उरण ,शिळफाट्याच्या घटनेनंतर आता इंदापुर....

इंदापुर प्रतिनिधी / अतुल सोनकांबळे

महाराष्ट्रामध्ये सध्याला यशश्री शिंदे व अक्षता म्हात्रे बलात्कार प्रकरण चर्चेत असतानाच आता हेच लोन इंदापूर तालुक्यातील खेडे गावात देखील पोहोचले आहे.सध्या इंदापूरशहर हे एका खळबळजनक घटनेने चर्चेत आले आहे.

नववीत शिकणाऱ्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर रविवार दिनांक २८ जुलै रोजी शाळेतील कारकूनाने घरी कोनी नसल्याचा फायदा घेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.मुलीने प्रतिकार केला म्हणून या अल्पवयीन शाळकरी मुलीला लिपिकाने कीटकनाशक पाजले व त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.



इंदापूर तालुक्यातील वकील वस्ती या गावात रविवारी ही घटना घडली असून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरात कोणी नसल्याचे पाहून शाळेतील लिपिकाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला या मुलीने प्रतिकार करताच लिपिक रणजीत जाधव या नराधमाने अल्पवयीन मुलीस विष पाजले . इंदापूर पोलिसांनी पोक्सो व खुन करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला व आरोपी रणजीत जाधव रा. सराटी ता.इंदापूर जि. पुणे यास ताब्यातही घेतले या शाळकरी मुली वरती अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असतानाच आज तिचा मृत्यू झाला




इंदापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना असून इंदापूर पोलिसांनी आरोपी रणजीत जाधव यास ताब्यात घेतले आहे व पुढील तपास चालू आहे.२८जुलै पासुन या मुलीची मृत्युसी झुंज चालु होती आज आखेर ती झुंज संपली व तीचा मृत्यु झाला

Post a Comment

Previous Post Next Post