शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दलित विदयार्थ्यांचं हत्याकांड.... लातूर जिल्हा हा दलीत अत्याचारित जिल्हा म्हणून घोषित करावा...





लातुर हदरलं....
दलित विदयार्थ्यांचं हत्याकांड.... लातूर जिल्हा हा दलीत अत्याचारित जिल्हा म्हणून घोषित करावा...
प्रतिनिधी : अमर जाधव
अरविंद खोपे, वय -13 इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा. उराशी स्वप्न बाळगून आई वडिलांनी त्याला लातुर ला शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठविले, स्वामी विवेकानंद आश्रम शाळा,आपला मुलगा मोठा होऊन गरिबी दुर करेल हे स्वप्न आई वडिलांचे होते. आईवडील मिळल ते काम करून उपाजीविका भागवीत आहे. वडील मुंबई मध्ये कामासाठी माझा अरविंद मोठा होऊन, घराण्याच नाव उज्ज्वल करेल या स्वप्नात वावरत होते.




               आश्रम शाळेत अरविंद ची परीक्षा आहे म्हणुन आई वडिलांनी पांगरी(परळी, जि-बीड)येथून अरविंद ला आश्रम शाळेत लातुर ला सोडले, काल दिनांक 29/07/2024 रोजी अरविंद च्या आई वडिलांना शिक्षकांनी अरविंद च्या आई वडिलांना फोन केला. तुमच्या अरविंद च्या पोटला काहीतरी लागलंय त्याच्या पोटातून रक्त येताय, आश्रम शाळेपासून गाव दुर असल्यामुळ नातेवाईकांना तिथं पाठवलं.तर शिक्षकांनी सांगितलं अरविंद पळून गेला. दुपारी आई वडिलांना फोन धडाकाला अरविंद पळून गेला.


अरविंद चा शोधाशोध घेत असताना आश्रम शाळेतील एका बाथरूम मध्ये मृत्यूदेह लटकट होता, सुनियोजित कट असुन सखोल चौकशी झाली पाहीजे असी जनतेत चर्चा आहे,

Post a Comment

Previous Post Next Post