शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेती महामंडळाच्या कामगारांच्या मागण्या महसूलमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मार्गी लावू - हर्षवर्धन पाटील

शेती महामंडळाच्या कामगारांच्या मागण्या महसूलमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मार्गी लावू - हर्षवर्धन पाटील 
- अंकिता पाटील ठाकरे यांची उपोषणस्थळी भेट  
*इंदापूर प्रतिनिधी : अतुल सोनकांबळे* दि.20/7/24
                 शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी 2 गुंठे जागा व नवीन घराच्या मागणीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बरोबर तात्काळ बैठक घेऊन, सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 20) दिली.
     वालचंदनगर येथे शेती महामंडळाच्या कामगारांच्या जागा व घराच्या मागणी संदर्भात दि. 18 जुलै पासून बेमुदत उपोषणास बसलेल्या घनश्याम निंबाळकर, हर्षवर्धन गायकवाड, प्रकाश धांडोरे,अतुल बनसोडे या सामाजिक कार्यकर्त्यांची व शेती महामंडळाच्या कामगारांच्या कुटुंबीयांची पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषण स्थळी शनिवारी दि. 20 भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
        हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शेती महामंडळाच्या कामगारांचे अनेक प्रश्न गेली 30 वर्षांमध्ये सोडवण्यासाठी मी सहकार्य केले आहे. आताही शेती महामंडळाच्या  कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी सहकार्याची भूमिका राहील, त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व मागण्या निश्चितपणे सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. 
           यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी  उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड, राजेंद्र बोंद्रे, शिवशरण, तसेच शेती महामंडळाचे कामगार व कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  ______________________________

Post a Comment

Previous Post Next Post