शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तालुक्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदी आमदार दत्तात्रय भरणे



इंदापूर तालुक्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजना समितीच्या अध्यक्षपदी आमदार दत्तात्रय भरणे

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली नियुक्ती 

प्रतिनिधी /अतुल सोनकांबळे

पुणे(इंदापुर) ता. 30  :  इंदापूर तालुक्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजना समितीच्या अध्यक्षपदी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी श्री भरणे यांच्या नियुक्ती केल्याचे आदेश 29 जुलै रोजी एका आदेशाच्या आधारे काढले आहेत.

श्री भरणे यांच्यासह या  एकूण ११ सदस्य या समितीचे कामकाज पाहणार आहेत.
यापूर्वी श्री भरणे यांनी तालुक्यातील गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुका स्तरावर तसेच गावोगावी या योजनेसाठी शिबिरे आयोजित केली होती 




तसेच अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र शिबिरे गावोगावी भरवून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्यास प्राधान्य दिले आहे.
समितीच्या अध्यक्षपदी श्री भरणे यांची निवड झाल्याने खऱ्या अर्थाने तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post