लाडक्या बहिणीच्या पैश्यावर दरोडा टाकणाऱ्या बॅंकांवर गुन्हा दाखल करा.....मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरपीआयची मागणी
....अन्यथा बॅंक मॅनेजरच्या तोंडाला काळं फासणार
इंदापुर : प्रतिनिधी अतुल सोनकांबळे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे हजारो करोड रुपये विविध बँकांनी लाभार्थ्यांच्या खात्यावरुन लाथार्थ्याला न विचारता काढुन घेवुन लाडक्या बहिणीच्या खात्यातील पैशावर दरोडा टाकल्यामुळे संबंधीत सर्व बँकांवर दरोडयाचा गुन्हा नोंद होवून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आरपीआयच्या वतीने संबंधीत बँकांचे बँक मॅनेजर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा इंदापुर तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दिल आहे.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे. राज्यातील महिला भगिनींना दरमहा १,५०० रुपयांची मदत देण्याचा शासनाकडून अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. माहे जुलै २०२४ ते माहे ऑगस्ट २०२४ या दोन महिण्यांचे एकुण ३,००० रुपये राज्यातील लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु ते अनुदान बँकेत लाभार्थ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर बँकेने ते अनुदान परस्पर कर्जामध्ये अथवा इतर बँक प्रक्रियेत वळते करुन घेतले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्या लाभार्थ्याकडून खात्याचा अनेक दिवसापासून वापर केला गेला नाही. तसेच खात्यावर कमी रक्कम असल्याने मोठया प्रमाणात बँकांनी दंडात्मक कारवाई केली आहे. ही सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावरुन तात्काळ वजा केली जात आहे. त्यामुळे दोन महिण्यांचे तीन हजार रुपये जमा होवुन सुध्दा बहिणींच्या हातात दमडाही आलेला नाही. त्यामुळे या योजनेचा खरा लाभ बँकांना झाला असून, हजारो करोडो रुपयांचा फायदा बँकांना झाला आहे. आणि लाभार्थी बहिणी या योजनेपासून वंचित होत आहेत. आणि त्या सर्व बहिणी आजच्या घडीला नाराज असल्याचे दिसुन येत आहे.
इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने झिरो बॅलन्सवर महिलांची खाती काढुन त्यांना सर्व अनुदानाचा लाभ मिळवून दिला आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोडली तर इतर सर्व बँकांनी या बहिणींच्या पैशावर दरोडा टाकल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाचे पत्र कं. मबावि २०२४/प्र.क. ९६ (भाग २)/का २ या पत्राचा अवमान करणाऱ्या बँकांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सरवदे यांनी केली आहे.



Post a Comment