शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर येथे श्री.नारायणदास रामदास हायस्कूल मधील दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेतच मृत्यू



इंदापूर येथे श्री.नारायणदास रामदास हायस्कूल मधील दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेतच मृत्यू

इंदापुर प्रतिनिधी /अतुल सोनकांबळे

श्री. नारायणदास रामदास हायस्कूल मधील इयत्ता दहावी शिकणारा विद्यार्थ्यां
प्रथमेश विकास खबाले (वय 16 वर्षे, रा.भाटनिमगाव,ता.इंदापूर) या शाळेतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून  या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश विकास खबाले हा श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे इयत्ता दहावी शिकणारा विद्यार्थी दुपारी शाळेत आल्यानंतर दैनंदिन वेळे प्रमाणे शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर हा विद्यार्थी वर्गात गेला.

त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली. शिक्षकांनी त्यास इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले..
या दुःखद घटनेने इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेतेमंडळी यांनी शोक व्यक्त केला आहे

Post a Comment

Previous Post Next Post