शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने प्रवीण माने यांनी धरला अंतरपाठ



विवाह सोहळ्याच्या निमित्ताने प्रवीण माने यांनी धरला अंतरपाठ

इंदापुर प्रतिनिधी / अतुल सोनकांबळे

संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सोनाई प्रतिष्ठान आयोजित मोफत सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळा मोठ्या दिमाखात नुकताच पार पडला. माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे तथा सोनाई परिवाराचे संचालक असलेल्या श्री प्रविण माने यांनी या विवाह सोहळ्याचे संपूर्ण आयोजन केले होते.

या कार्यक्रमाची चर्चा अद्याप संपूर्ण तालुकाभर होत असताना, आज निमगाव केतकी येथील केतकेश्वर मंगल कार्यालय येथे भोंग - सुरवसे आणि भोंग - शिंदे यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून प्रवीण माने यांनी वधू-वरांस वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मंगलाष्टकांच्या वेळी माने यांनी अंतरपाठही धरला.

Post a Comment

Previous Post Next Post