शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

तलावात पाय घसरून चिट मोगरा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकरी युवकाचा मृत्यू..



तलावात पाय घसरून चिट मोगरा तालुका बिलोली जिल्हा नांदेड  येथील शेतकरी युवकाचा मृत्यू.. 

रघुनाथ सोनकांबळे विभागीय संपादक.... 

मौजे चिटमोगरा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकरी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पिकावर फवारणी मारण्यासाठी तलावातील पाणी घेण्यासाठी गेल्याने शिवाजी मलबा काळेकर या शेतकरी युवकाचा तलावात पाय घसरून  बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने चिटमोगरा व शंकर नगर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 16 ऑगस्ट रोजी शिवाजी मलबा काळेकर यांनी पिकाला फवारणी मारण्यासाठी तलावातील पाणी घेण्यासाठी  गेल्याने पाय घसरून तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली तलावात पडलेल्या शिवाजीचा शोध गावातील नागरिक व बाहेरगावचे भोई आपले जाळे घेऊन संपूर्ण तलाव शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा शोध काही लागला नाही.


शेवटी 22 ते 23 तासाच्या नंतर मृतदेह पाण्याच्या वर आला आसता रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिंदे यांनी घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केला.व प्रेत वैद्यकीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले व प्रेताचे पोस्टमार्टम करून प्रेत नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी हवाली करण्यात आले असून चीटमोगरा येथील स्मशानभूमीत 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार करण्यात आले मयत शिवाजी काळेकर याच्या पाशात पत्नी एक मुलगा तीन मुली व भाऊ असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post