वंचित बहुजन आघाडीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी संतोष मिसाळ यांची निवड.
आनेक सामाजीक संघटना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या तर्फे अभिनंदन व शुभेच्छा
इंदापूर प्रतिनिधी / अतुल सोनकांबळे .
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर पुणे जिल्हा प्रभारी प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या आदेशाने
वंचित बहुजन आघाडीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी संतोष मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. संतोष मिसाळ हे गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये काम करत असून त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे मिसाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या सहीचे नुकतेच मिळाले असून. यावेळी बोलताना मिसळ म्हणाले की पक्षाने माझ्यावरती टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल व पक्षाचे ध्येयधोरण विचारधारा गावोगावी खेड्यापाड्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असे यावेळी सांगितले.
तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजकुमार साहेब तसेच जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मिसळ यांनी आभार मानले


Post a Comment