शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मानाच्या पालखीच्या गणपतीला मनोभावे निरोप देत सर्व श्री विसर्जन स्थानिक पोलीस बंदोबस्तात डीजे मुक्त सोहळा थाटात संपन्न ....



मानाच्या पालखीच्या गणपतीला मनोभावे निरोप देत सर्व श्री विसर्जन  स्थानिक पोलीस बंदोबस्तात डीजे मुक्त सोहळा थाटात संपन्न ....     

नायगाव प्रतिनिधी /  रघुनाथ सोनकांबळे 
                      
    नायगाव शहरात  74 वर्षाची परंपरा असलेल्या  सार्वजनिक मानाचा  पालखीचा नवसाला पावनारा गणपतीची स्थापना लोकप्रतिनिधी, व्यापारी, गावकरी, यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती. तीच परंपरा त्यांच्या वारसासह लोकप्रतिनिधी, व्यापारी ,गावकरी चालवीत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळ मानाचा पालखीचा नवसाला पावणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात स्थापना करण्यात आलेल्या गणरायाचे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणरायाची महाआरती स्वर्गीय खा. वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र  प्रा.रविंद्र वसंतराव  चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर मानाच्या गणपतीचा प्रसाद स्वरूपात नारळाची बोली लावण्यात आली .या बोलीत गणेश पाळेकर यांनी हा प्रसाद स्वरूपात नारळ एकावन्न हजार रुपये मध्ये घेतला. त्यानंतर पालखीच्या मानाच्या गणपतीची सजवलेल्या पालखीतून भव्य दिव्य ढोल ताशा टाळ मृदंगाच्या गजरात आतिशबाजीत भगव्या पताका घेऊन मिरवणूक  नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून जुन्या गावातील हनुमान मंदिरापासून निघाली यावेळी प्रा .रविंद्र  पाटील चव्हाण. केशवराव पाटील चव्हाण. हनमंतराव पाटील चव्हाण. श्रीनिवास पाटील चव्हाण. उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण,संजय बेळगे. वसंतराव मेडेवार, चंद्रकांत कवटीकवार, भगवानराव लंगडापुरे , विनोद गंजेवार.बाबू सावकार आरगुलवार,संजयराव पाटील चव्हाण.नारायण पाटील जाधव.पंढरी भालेराव. शिवाजी कल्याण .शरद भालेराव.उत्तम सावकार वट्टमवार, देविदासराव बोंमनाळे, संगमनाथ  कवटिकवार, बालाजी बच्चेवार, विठ्ठल बेळगे.सुधाकर जवादवार. सतीश मेडेवार ,सतीश लोकमानवार , शिवाजी वडजे. श्रीनिवास जवादवार ,प्रा. जीवन चव्हाण, नरहरी आरगुलवार, श्रीनिवास गडपल्लेवार.संजय मोरे टाकळीकर. पत्रकार गजानन चौधरी, पत्रकार रामप्रसाद चन्नावार. साईनाथ मेडेवार, शंकर लाब्दे, पांडू पाटील चव्हाण .मनोज गंदेवार, गजानन फुलारी, शंकर बेळगे, प्रल्हाद पाटील बोमनाळे,   यांच्यासह शहरातील वीस गणेश मंडळे व वीस देखावे त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या उत्साहात सहभागी झाले होते.  


विशेष..... 

नायगाव पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत नायगाव शहरात पहिल्यांदाच डीजे मुक्त श्री चे विसर्जन करण्यात आले. या विसर्जनाच्या सोहळ्यात मिरवणुकीच्या समोर वेगवेगळे ढोल, ताशे अशा प्रकारचे वाद्य वाजत होते. सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी सर्वतोपरी चौक बंदोबस्त ठेवला होता.  सर्व पोलीस कर्मचारी  सोबत घेऊन सकाळपासून ते पूर्ण विसर्जन होईपर्यंत पोलीस कर्मचारी तैनात होते. त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. हे विशेष .सर्व श्री चे विसर्जन शांततेत पार पडले. या विसर्जन बंदोबस्तात पोलीस निरीक्षक अजित कुंभार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित , पोलीस उपनिरीक्षक भीमराव कदम व त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल चर्कुलवार पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ सांगवीकर,  पोलीस हेडकॉन्स्टेबल सोपान होळगे, संदीप देगलूरकर राजेश वाघमारे बालाजी शिंदे शंकर पवार व सर्व होमगार्ड यांच्या सह महिला पोलिस कॉन्स्टेबल व सर्व स्थानिक चा स्टॉप यांचा चौक बंदोबस्त होता.....

Post a Comment

Previous Post Next Post