शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर एक ऑक्टोबर रोजी हजारोच्या संख्येने सामील व्हा... राजेंद्र कांबळे

       
          रघुनाथ सोनकांबळे 
    नायगाव  :-नांदेड. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुंबई येथे एक ऑक्टोबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी प्रचंड मोर्च्याच्या आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चर्मकार महासंघाचे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी केले आहे. चर्मकार समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की चर्मकार समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केलेला आहे 
           .त्या संदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक ही घेण्यात आली होती. त्या बैठकीत चर्मकार महासंघाच्या वतीने केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु  त्याची अंमलबजावणी झाली नाही. ती अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देण्यासाठी एक ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . 
              राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सरकारला संत  रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज प्रकरणी माफ करण्यात यावे. संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी शंभर एकर जमीन व निधी त्वरित देण्यात यावी .संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. संत रविदास कौशल्य विकास बार्टीप्रमाणे सुरू करून बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे केंद्र सुरू करण्यात यावे .संत रविदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे. एक ना अनेक अशा मागण्या मंडळाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. आणि त्या मान्य ही करण्यात आल्या होत्या. 
            परंतु कुठे माशी शिंकली ते कळाले नसल्याने सदर मागण्यांच्यासाठी अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारला मागण्यांची आठवण व्हावी म्हणून एक ऑक्टोबर रोजी आजाद मैदान या ठिकाणी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन दक्षिण चे नांदेड जिल्हाध्यक्ष  राजेंद्र कांबळे यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post