शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राज्यांच्या परिवहन विभागामधील कर्मचा-यांचा सुरू असलेला बेमुदत संपावर सकारात्मक तात्काळ तोडगा काढा - राजाभाऊ सोनकांबळे

रणजित दुपारगुडे 
               सोलापूर  
       महाराष्ट्र मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.24 सप्टेंबर पासुन सुरू असलेल्या मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर न्यायिक सकारात्मक तोडगा काढा.असे कळकळीचे आवाहन कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय सरचिटणीस तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ सोनकांबळे यांनी जाहीर आवाहन केले आहे.
            महाराष्ट्र मोटार वाहन कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र शासनाला                      1) आकृतीबंधाची अंमलबजावणी तात्काळ करावी.                                    2) आकृतीबंधुसार तात्काळ पदोन्नती देण्यात यावी.                                         3) सेवा प्रवेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.                                     4) समायोजन रद्द करावी.                                                 5) महसुली बदल्या रद्द करून विभागीय बदलांची प्रथा सुरू करावी.                                                  6) कळसकर समितीची सुधारित अंमलबजावणी करण्यात यावी.             7) सेवा प्रवेशातील जाचक अटी रद्द कराव्यात.इत्यादी विविध मागण्या करिता राज्यातील मोटार वाहन परिवहन विभागामधील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रादेशिक, उपविभागीय, तसेच सोलापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालया समोरील मुख्य प्रवेश द्वारासमोर सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केलेले आहे.
        त्यां आंदोलनास कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या सोलापूर विभागाच्या वतीने तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने  पाठिंबा देण्यासाठी रासकम संघटनेचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण पुतळे आणि भीमराव लोखंडे यांच्या कुशल व संघटीत नेतृत्वाखाली सोलापुरातील  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोरील मुख्य प्रवेश द्वारासमोर सोमवार पासुन सुरू असलेल्या बेमुदत संपास पाठिंबा देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील सुरु असलेल्या संपास्थळी जाऊन भेट दिली व पाठिंब्याचे पत्र दिले.यावेळी रासकम. संघटनेचे नेते राजाभाऊ सोनकांबळे, बाळकृष्ण पुतळे, भीमराव लोखंडे, यांच्या सोबत हुसेन बाशा मुजावर, प्रभाकर व्हनकळस आदीसह प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूरच्या कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जमादार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अध्यक्ष लोहार सर, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर मधील कर्मचारी वर्ग तसेच महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात लक्षवेधी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post