वाघाडीचे सरपंच किशोर माळी हल्ला प्रकरणातील फरार १३ आरोपींना शिरपूर पोलिसांकडून अटक
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज
धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर
धुळे शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला चढवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ संशयितांना पोलिसांनी अटक. केली. हे सर्व हल्ला झाल्यावर फरार झाले होते. शिरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजेला वाघाडी गावात बसस्टॅण्ड जवळील पानटपरीजवळ व ग्रामपंचायत कार्यालयमध्ये ही घटना घडली. अनिल वेड्डु खलाणे, सुनील शालीकराव माळी व वाघाडी गावाचे सरपंच किशोर विठ्ठल
माळी यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आणि मिळालेल्या गुम माहितीतून राहुल दत्तु कोळी व विशाल उर्फ अविनाश अशोक कोळी दोन्ही रा. वाघाडी ता.
शिरपुर हे वाघाडी गावातच असल्याची खात्री झाली. यामुळे वाघाडी गावातच सापळा लावून २० सप्टेंबर रोजी दोघांना आधी अटक करण्यात आली. यानंतर लोटन शामराव कोळी व रविंद्र भिका कोळी खेतीया ता. पानसेमल
जि. बडवाणी येथून २४ सप्टेंबर २०२४ रोजी ताब्यात घेण्यात आले. जगदीश रघुनाथ कोळी, दादु उर्फ रामप्रसाद सुकनंदन कोळी, समाधान भरत कोळी, राज भरत कोळी, निलेश दिलीप कोळी, जयेश प्रविण
कोळी, रोहीत उर्फ धिरज शरद कोळी, गुलाब सुरेश कोळी, धनराज सोमा कोळी सर्व रा. वाघाडी ता. शिरपुर जि. धुळे हे वाधाडी गावाजवळ शहादा स्त्यावरील शेतात सापडले त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Post a Comment