शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वंचित बहुजन आघाडी स्थानिक नागरिकांच्या विविध अडचणीसाठी येणाऱ्या 14 तारखेला करणार रेल रोको आंदोलन


जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण.

श्री क्षेत्र खंडोबा त देवस्थान तसेच कऱ्हामाई नदी स्नानसाठी येणारे भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी स्थानिक नागरिकांना घेऊन जेजुरी रेल्वे स्टेशन येथे रेल रोको करणार
    श्री क्षेत्र जेजुरी खंडोबा देवस्थानला भाविकांची रेल्वेने येणारी संख्या जास्त आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे खंडोबाला आणि कऱ्हा स्नानसाठी येणारे भाविक आणि रेल्वे लगत उत्तर बाजूस राहणारे स्थानिक नागरिक यांना रोजच्या रहदारीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वंचित आहेत.
  मागील चार ते पाच वर्षात जेजुरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण चालू आहे नूतनीकरनाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे परंतु या नूतनीकरनात रेल्वेने येणारे प्रवासी आणि स्थानिक शेतकरी ,नागरिक यांना विश्वासात न घेतल्यामुळे गैरसोय निर्माण झाली आहे .
      जेजुरी रेल्वे स्टेशन ओलांडण्यासाठी लागणार फुटपाथ पूल दक्षिण-उत्तर आहे,कऱ्हा स्नानासाठी येणारे भाविक हे उत्तर बाजूस असणाऱ्या कऱ्हामाईला पायी जात असतात त्यांना येण्या जाण्यासाठी फुटपाथ पूल हा दोन नंबर प्लॅट फॉर्म पर्यंतच आहे  तो रेल्वेच्या रिझर्व्ह लाईनच्या पलीकडे नाही त्यामुळे भाविकांना रेल्वे पटरीतून चढ उतार करून जावे लागते तसेच स्थानिक नागरिक,उत्तर बाजूस असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये शिकत असणारे लहान विद्यार्थी याना येण्या जाण्यासाठी फुटपाथ पूल हा पुढे वाढवून वापरात दयावा.
   धालेवाडी गेट ते मोरगाव राज्य मार्ग हा पूर्व-पश्चिम असणारा रस्ता पक्का डांबरी व्हावा,परंतु हा करत असताना स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्या मध्ये भारतीय रेल्वे भिंत बनवत असून त्याला स्थनिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे.भिंत बांधल्यामुळे शेतजमिनीच्या किमती शून्य होणार असून स्थानिक नागरिकांची रहदारीचे गैरसोय होणार आहे .
     धालेवाडी रेल्वे फाटक बंद करून खंडोबा पालखी दक्षिणोत्तर रस्ता  हा भुयारी मार्ग करण्यात यावा जेणेकरून येणारे भाविक नि स्थानिक नागरिक यांना येण्याजाण्यासाठी तसेच इमर्जन्सी मध्ये रेल्वे फाटक बंद असल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे म्हणून खंडोबा पालखी मार्ग भुयारी करावा मागणी आहे
     जेजुरी रेल्वे स्टेशन च्या हद्दीत असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पडणार असून शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी यांची गैरसोय होणार नाही म्हणून मूळ जागेत बांधकाम झाल्याशिवाय शाळा पाडू नये.
    अशा एकनाअनेक जेजुरी रेल्वे स्टेशनशी निगडित भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडी,पुरंदर तालुका अध्यक्ष मा.श्याम माने,पदाधिकारी मा.जाफरभाई सय्यद  ,सचिन तुरुकमारे महासचिव पुरंदर तालुका, मा.स्वप्नील भालेराव माथाडी अध्यक्ष पुरंदर , मोहन रणदिवे ट्रान्सपोर्ट अध्यक्ष जेजुरी शहर अनेक सहकारी,पदाधिकारी स्थानिक नागरिकांना घेऊन १४ऑक्टोबर २०२४ रोजी जेजुरी रेल्वे स्टेशन ला रेल रोको करणार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post