शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राहुरी फॅक्टरीत फातिमा माता चर्च येथे ३० ऑक्टोबर रोजी ; फातिमा मातेचा यात्रा उत्सव...

          जालिदर आल्हाट 
        ‌             अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी 
         राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या फातिमा माता चर्च येथे सालाबाद प्रमाणे या ही वर्षी पवित्र माळेची सांगता व फातिमा मातेचा यात्रा उत्सव मोठ् उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश राऊत यांनी दिली.
            यात्रा उत्सवाचे यंदाचे २४ वे वर्ष असून दिनांक २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर रोजी नोव्हेना भक्ती असणार आहे यामध्ये रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी रे.फा.राजू शेळके,सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी रे.फा.मायकल वाघमारे तसेच मंगळवार दि.२९ ऑक्टोबर रोजी रे.फा.सतीश कदम आदी धर्मगुरूंच्या उपस्थितीत नोव्हेना भक्ती होणार आहे.
         बुधवार दि.३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पवित्र मरियेची मिरवणूक होईल व सायंकाळी ५.३० वाजता नाशिक धर्मप्रांताचे महागुरू बिशप बर्थोल बरेटो यांच्या प्रमुख उपस्थितीत व अनेक धर्मगुरूंच्या उपस्थितीत यात्रेचा मिस्सा होणार आहे.
         तरी या यात्रा उत्सवात जास्तीत जास्त संख्येने उपस्थि राहून पवित्र मरियेचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश राऊत तसेच येशू मारिया सदनच्या सिस्टर सुपिरिअर सितारा ओहोळ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post