शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पावसाने झोडपले, सरकारने सावरावे,देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन...

संकेत बागेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी 
        धुळे :  धुळे जिल्यातील देऊर खु. , देऊर बु., नांद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही २०२४ खरीप हंगामातील कापूस,कांदा,मका या पिकांसाठी मुदतीत प्रधानमंत्री पीकविमा योजनेला अर्ज भरला आहे. 
          मात्र, मागील १५ दिवसात परतीच्या पावसाने आमच्या पिकांचे अतोनात नुकसान केले.. कपाशीची बोन्डे काळी पडलीत, कपाशी लाल झाली तर मक्याचे पीक काळे होऊन मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहे. कबाडकष्टाचे पीक हातातून गेले. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता फोन लागत नाही, तक्रारींची दखल घेतली जात नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
        प्रशासनाने पुढाकार घेऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलून नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाठवावे आणि शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा,अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने प्रदीप शिवाजी देसले, विजय देवरे, हंसराज देसले, गणेश देसले, संतोष पवार, हिंमत देसले यांनी ही मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post