शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी मातंग समाजाच्या बैठकीत वज्रमूठ

          रघुनाथ सोनकांबळे 
                         नायगाव प्रतिनिधी 
       नांदेड : नायगाव  गेल्या पन्नास वर्षापासून विविध राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा फक्त मतदान पुरता वापर केलेला आहे याची जाणीव ठेवून समाजाच्या प्रलंबित मागण्याशी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील जो उमेदवार कटिबद्ध आहे त्यांच्यासोबतच मातंग समाज उभे राहील असा आयोजित बैठकीत निर्धार करून मातंग समाजाने वज्रमुठ बांधली आहे.
          नायगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्या पक्षांच्या उमेदवारासोबत समाज एकजुटीने उभा राहावा यावर आपले मत काय असेल हा विषय घेऊन नायगाव शहरातील उद्योजक कैलाश भालेराव यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषदेची माजी सदस्य भाऊसाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजातील प्रमुख व्यक्ती आणि कार्यकर्ता यांची बैठक आयोजित केलेल्या वेळी राजेश मनुरे, नामदेव सोनकांबळे, धर्माबाद सरपंच संघटनेचे अध्यक्ष निदानकर,अशोक कुदळेकर, सरपंच भंडारे उमरी, सरपंच दत्तात्रय आईलवार, उत्तमराव गवाले,संजय भांगे, कैलास भालेराव,शंकर गायकवाड,गंगाधर कोतेवार, रणजीत गोरे, जीवन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून बैठकीतील चर्चा सत्रात अनेकांनी आपले मत मांडले गेल्या अनेक वर्षापासून समाजातील विविध संघटनेचे कार्यकर्ते यांनी अ ब क ड वर्गीकरण करून मातंग समाजाला आरक्षण द्यावे, सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,नरसी येथील चौकात अण्णाभाऊ साठे चा बसविण्यात आलेला पुतळा तो काढण्यात आला तो बसविण्यात यावा अशा अनेक समाज हितांच्या मागण्यासाठी आंदोलन केली पण कोणताही आजवर नेता या मागण्या गांभीर्याने लक्षात घेतलेले नाहीत म्हणून या समाजाच्या मागण्या संदर्भात जो उमेदवार कटिबद्ध राहील त्यांच्यासोबत समाज राहील याबाबत लवकरच कोर कमिटीतून नायगाव उमरी धर्माबाद या तीन तालुक्यातील समाजाचा निर्णय घेऊन आपली भूमिका ठरविण्यात येईल.
           असा एकजुटीचा निर्धार करून सदर बैठकीत मातंग समाजाने वज्रमुठ बांधली आहे. यावेळी दतराम बैलकवाड, रामदास कांबळे,पुनमभाऊ धमनवाडे, परमेश्वर वाघमारे, बालाजी वाघमारे,दिगंबर झुंजारे, अशोक वाघमारे,विश्वंभर धसाडे, संजय गायकवाड यासह अनेक समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم