शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुरंदर हवेली विधानसभेवर भगवा फडविण्यात शिवतारेंना यश संजय जगताप यांना पराभवाचाधक्का पुरंदरचा किल्लेदार :विजय शिवतारे



      
         जेजुरी प्रतिनिधी :  संदिप रोमण
           जेजुरी : पुरंदर विधानसभेसाठी आज दि. २३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सासवड येथील नवीन शासकीय इमारत संपन्न झाली. 
या निवडणुकीत प्रामुख्याने तीन उमेदवार यांच्यात 
मुख्य लढत होती. या लढतीत महायुतीचे उमेदवार विजय 
शिवतारे यांनी बाजी मारली असून, विजय शिवतारे
विजयाचे मैदान मारले आहे. यामुळे पुरंदर हवेली विधानसभेवर 
शिवतारे यांना *२०१९* चा अपवाद वगळता तिसऱ्यांदा भगवा 
फडकविण्यात यश आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या 
फेरीपासूनच शिवतारे हे आघाडीवर होते. काही ठिकाणी 
त्यांच्या लीडमध्ये फरक पडला. मात्र, पहिल्या २० फेऱ्यांमध्ये
त्यांनी २२ हजारांचे लीड घेतले होते. त्यांच्या विजयामुळे विद्यमान आमदार संजय जगताप यांना पराभवाचा सामाना करावा लागला
आहे. 
पुरंदर हवेली ची काँग्रेसची जागा शिवसेना ( शिंदे) गटाला मिळाली आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून *विजय शिवतारे* यांनी २०१९
निवडणुकीच्या पराभवाचा वचपा 
काढला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post