शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधानसभा निवडणुकीचा अहवाल मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे सादर केला.

.        मोसीन आतार
                  प्रतिनिधी 
मतपात्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी भारत जोडो सारखी "लोकशाही वाचवा"  सह्यांची मोहीम सुरू करणार :- नानाभाऊ पटोले

मुंबई :- २८ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नानाभाऊ पटोले  यांनी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, शहर व जिल्हा अध्यक्ष यांची बैठक टिळक भवन दादर येथे आयोजित केली होती.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधानसभा निवडणुकीचा अहवाल मुंबई येथील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांच्याकडे सादर केला.

या बैठकिस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, भाई जगताप यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
        यावेळी बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले की निवडणूक प्रचारात काँग्रेस महाविकास आघाडीला मोठ्ठा प्रतिसाद होता. महाविकास आघाडी सत्तेवर येणार असे दिसत होते. पण महायुतीने बेईमानाने सत्ता घेतली. महायुतीला एवढे बहुमत कसे मिळाले आहे जनता सुद्धा संभ्रमित आहे. लोकांच्या मतदानाने नाहीत तर मशीन ने सत्ता काबीज केली आहे अशी शंका अनेकांनी व्यक्त केले. अनेक उमेदवार EVM वर शंका उपस्थित केले आहे. आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासाठी
भारत जोडो सारखी "लोकशाही वाचवा"  सह्यांची मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना नानाभाऊ पटोले म्हणाले थोड्याच दिवसा
          त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार आहेत न खचता त्यासाठी कामाला लागा. संघटना बळकट करून रस्त्यावरची लढाई साठी सिद्ध व्हा असे आवाहन यांनी केले आहे.
यावेळी सोलापुरातून चेतन नरोटे, तिरूपती परकीपंडला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे उमेदवार, शहर अध्यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post