परभणी हिंसाचाराची सी.बी.आय चौकशी करण्यात यावी - 
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी
प्रतिनिधी -मोसीन आतार
महाराष्ट्र - परभणी या ठिकाणी मुख्य चौकात असलेल्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका प्रतिमेची विटंबना एका माथेफिरूने केली.त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.या अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली आहे.
या आंदोलनात विधी या शैक्षणीक वर्षा मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.या प्रकरणी मारहाण करणारे जे पोलिस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर सोलापुरच्या वतीने केली आहे.
माजी समाजकल्याण मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ मा.बबनराव घोलप यांच्या आदेशा नुसार राज्यामध्ये सर्वत्र संघटने कङून राज्यभर निषेध आंदोलन घेण्यात आले.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील नायब तहसीलदार यांना निवेनाद्वारे मागणी करण्यात आली
परभणी येथील आंदोलनानंतर बौध्द वस्तीत भिमनगर, प्रियदर्शीनगर इत्यादी विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कोंबींग ऑपरेशन करून बौध्द बांधवांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली.सोबतच त्यांच्या घराची,मोटार सायकली, कारची पोलीसांनी आणि त्यांच्या भाडोत्री गूंडांनी नुकसान केले.अनेक निष्पाप नागरिकांना पोलीसांनी बेकायदेशीर अटक केल्याचे समजते.अनेक महिलांना आणि शालेय, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वरील सर्व प्रकरणाची सी.बी.आय.मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर व पोलीस गुंडांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हयाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे,शहर अध्यक्ष परशूराम मब्रुखाने,तानाजी जाधव,जिल्हा महिला अध्यक्षा कविता कोडवान, अनिता गवळी, वनिता कासे, भाग्यश्री शिंदे,आशा सातपुते सिद्धू मेल्ले,राजू कर्दम,बाळासाहेब कांबळे ,धर्मा कोडवान,यल्लप्पा कासे ,पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वारसह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment