शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद नजीर यांची निवड,

मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद नजीर यांची निवड,

मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेची आज दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती मुखेड येथे DNA / 136 ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना महाराष्ट्र शाखा मुखेड यांची बैठक पंचायत समिती सभागृह मुखेड येथे जिल्हा उपाध्यक्ष पी . जी . नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली
 यावेळी ग्रामसेवक ग्रामपंचायत आधीकरी यांच्या उपस्तिथीत निवडीची प्रक्रीया करण्यात आली यानंतर इच्छूक बेंद्रीकर राजेश , कल्याणकर वसंतराव व इतर ग्रामसेवकांनी समर्थन दर्शवीले तसेच सूचक एम . डी . शिंदे , सतिष गायकवाड , एम . एम अंबुरे यांनी सुचविल्या नुसार सदर नावावर चर्चा झाली व मणियार एम . एम . तसेच रेनगुंटवार बालाजी व सर्व महिला ग्रामसेवक यांच्या अनुमोदनाने सर्वानुमते सय्यद नजीर यांची ग्रामसेवक ग्रामपंचायत आधिकारी संघटना तालुका शाखा मुखेडच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांचा संघटनेकडून भव्य सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या व तसेच महिला ग्रामसेविका सो भवर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,, नांदेड जि,प्रातिनिधी राजु रोडगे

Post a Comment

Previous Post Next Post